RR vs RCB Eliminator: ९ वेळेस प्लेऑफ ३ वेळेस फायनल; प्लेऑफमध्ये RCB चा टेन्शन वाढवणारा रेकॉर्ड

IPL 2024 Eliminator Round, RCB Record In Playoffs As Compare to RR: क्वालिफायरच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ राजस्थान रॉयल्स संघाचा सामना करणार आहे.
RR vs RCB, IPL 2024: ९ वेळेस प्लेऑफ ३ वेळेस फायनल; प्लेऑफमध्ये RCB चा टेन्शन वाढवणारा रेकॉर्ड
RCB Playoffs Record

आयपीएल २०२४ स्पर्धेतील प्लेऑफच्या सामन्यांना प्रारंभ झाला आहे. स्पर्धेतील क्वालिफायरचा पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने बाजी मारत फायनलमध्ये धडक दिली आहे. तर हैदराबादला फायनलमध्ये जाण्याची आणखी एक संधी मिळणार आहे. एलिमिनेटरच्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. दरम्यान प्लेऑफमध्ये कसा राहिलाय या दोन्ही संघाचा रेकॉर्ड? जाणून घ्या.

RR vs RCB, IPL 2024: ९ वेळेस प्लेऑफ ३ वेळेस फायनल; प्लेऑफमध्ये RCB चा टेन्शन वाढवणारा रेकॉर्ड
Virat Kohli Record: विराटच्या रडारवर IPL स्पर्धेतील सर्वात मोठा रेकॉर्ड! असा कारनामा करणारा ठरणार पहिलाच फलंदाज

९ वेळेस प्लेऑफ ३ वेळेस फायनल

आयपीएल २०२४ स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने निराशाजनक कामगिरी केली होती. गुणतालिकेत सर्वात शेवटी असताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ स्पर्धेतून बाहेर पडणारा पहिला संघ ठरेल, असं वाटलं होतं. मात्र गेल्या ६ सामन्यांमध्ये या संघाने विजय मिळवून प्लेऑफमध्ये आपलं स्थान निश्चित केलं आहे.

या संघाने ९ व्यांदा आयपीएलच्या प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. यादरम्यान ३ वेळेस फायनलमध्ये प्रवेश केला. मात्र एकदाही या संघाला आयपीएलची ट्रॉफी जिंकता आलेली नाही. तिन्ही वेळेस या संघाला फायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे.

प्लेऑफमध्ये कसा राहिलाय रेकॉर्ड?

आयपीएल स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने ८ वेळेस प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. यादरम्यान ५ वेळेस या संघाने बाजी मारली आहे. तर ९ सामन्यांमध्ये या संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. हा संघ २०२२ मध्ये झालेल्या हंगामात शेवटचा प्लेऑफचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. क्वालिफायर २ मध्ये झालेल्या सामन्यात या संघाला ७ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला होता.

RR vs RCB, IPL 2024: ९ वेळेस प्लेऑफ ३ वेळेस फायनल; प्लेऑफमध्ये RCB चा टेन्शन वाढवणारा रेकॉर्ड
IPL 2024 Qualifier 1 SRH vs KKR: हैदराबादची फलंदाजी गडबडली; KKR समोर १६० धावांचे आव्हान

प्लेऑफमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज

विराट कोहली हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचा सर्वात यशस्वी फलंदाज आहे. त्याने या स्पर्धेतील प्लेऑफच्या सामन्यांमध्ये ३०८ धावा केल्या आहेत. तर ख्रिस गेलने ७ सामन्यांमध्ये २५० धावा केल्या आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com