IPL 2024 : लखनऊचं 'दुखणं' वाढलं; प्रमुख गोलंदाज शिवम मावी आयपीएलला मुकला!

IPL 2024: लखनऊ सुपर जायंट्सचा प्रमुख गोलंदाज शिवम मावी दुखापतीमुळं आयपीएल स्पर्धा खेळू शकणार नाही. मावी यावर्षी अद्याप एकही सामना खेळलेला नाही.
IPL 2024
IPL 2024 Yandex

LSG Player Shivam mavi Out of IPL 2024:

के. एल. राहुलच्या नेतृत्वात आयपीएलच्या यंदाच्या हंगामात चांगली कामगिरी करणाऱ्या लखनऊ सुपर जायंट्स संघाला सुरुवातीलाच तगडा झटका मिळाला आहे. तेजतर्रार गोलंदाज शिवम मावी हा आयपीएलला मुकला आहे. दुखापतीमुळं तो स्पर्धेबाहेर झाला आहे. यंदाच्या मोसमात तो लखनऊकडून एकही सामना खेळलेला नाही. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

IPL 2024
RCB vs LSG, IPL 2024: बंगळुरु- लखनऊ येणार आमने-सामने! केएल राहुल खेळणार का? पाहा दोन्ही संघांची प्लेइंग ११

शिवम मावी दुखापतग्रस्त आहे. लखनऊ सुपर जायंट्सच्या संघात तो होता. त्यामुळे एकही सामना खेळलेला नाही. लखनऊनं मंगळवारीच रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूला पराभूत केलं, पण हा आनंद फार काळ टिकू शकला नाही. दुसऱ्या दिवशीच शिवम मावी हा स्पर्धेबाहेर झाल्याचे वृत्त येऊन धडकलं.

शिवम मावी स्पर्धेबाहेर झाल्यानंतर संघाकडून अधिकृत प्रतिक्रिया आली आहे. दुर्दैवाने दुखापतीमुळे शिवम हा आयपीएल २०२४ मधून बाहेर झाला आहे. डिसेंबरमध्ये खेळाडूंच्या लिलावात वेगवान गोलंदाज शिवमला संघात घेतलं होतं. तो आमच्या संघाचा महत्वाचा खेळाडू होता. त्याचा या मोसमातला संघातील प्रवास खूपच कमी राहिला याचं आम्हालाही दुःख आहे. शिवम तंदुरुस्त होऊन संघात पुनरागमन करेल, अशी आम्हालाही अपेक्षा आहे, असं संघ व्यवस्थापनानं म्हटलं आहे.

लखनऊची आतापर्यंतची कामगिरी कशी आहे?

लखनऊ सुपर जायंट्सने आतापर्यंत तीन सामन्यांपैकी दोन सामने जिंकले आहेत. आयपीएलच्या गुणतालिकेत हा संघ चौथ्या स्थानी आहे. संघातील आणखी एक प्रमुख गोलंदाज मयंक यादव यानं आपल्या कामगिरीनं सर्वांनाच आश्चर्यचकित केलं आहे. अचूक टप्पा आणि दिशा, तसेच सर्वात वेगवान चेंडू फेकण्याच्या त्याच्या शैलीने भल्याभल्या फलंदाजांना त्यानं घाम फोडला आहे. दरम्यान, शिवमला लखनऊनं ६.४ कोटी रुपयांना खरेदी केलं होतं. शिवम याआधी गुजरात टायटन्स, कोलकाता नाइट रायडर्स या संघांकडून खेळलेला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com