Jasprit Bumrah Yoker: बुमराहच्या चेंडूनं हवेतच बदलली 'चाल'; गुल झालेली दांडी पाहून सुनीलला काही सुचेना VIDEO

Jasprit Bumrah clean bowled to Sunil Narine video viral : जसप्रीत बुमराहने पहिल्याच चेंडूवर केकेआरचा तडाखेबाज फलंदाज सुनील नारायणला क्लीन बोल्ड केलं. या यॉर्कर चेंडूचा व्हिडाओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.
KKR vs MI: बुमराहच्या चेंडूनं हवेतच बदलली 'चाल'; गुल झालेली दांडी पाहून सुनीलला काही सुचेना VIDEO
Jasprit Bumrah clean bowled to Sunil Narine video viral x ipl

आयपीएलचा ६०वा सामना केकेआर आणि मुंबई इंडियन्स यांच्यात रंगला. पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना १६ षटकांचा करण्यात आला. या सामन्यात केकेआरने मुंबईचा १८ धावांनी पराभव करत प्लेऑफच्या फेरीत प्रवेश केलाय. या सामन्यात केकेआरचा विजय जितका चर्चेत राहील तितकीच चर्चा जसप्रीत बुमराहच्या यॉर्करची राहील. बुमराहचा यॉर्कर चेंडू पाहून सुनील नारायणला धक्काच बसला. चेंडू कसा आला आणि कसा त्रिफळा उडला हे समजण्यात त्याला एक मिनिट लागला. दरम्यान बुमराहच्या या यॉर्कर चेंडूचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय.

मुंबईच्या गोलंदाजांनी केकेआरला डावाच्या सुरुवातीलाच मोठे धक्के दिले. पहिल्याच षटकात नुवान तुषाराने फिल सॉल्टला ६ धावांवर बाद केलं. त्यानंतर दुसऱ्याच षटकात जसप्रीत बुमराहने केकेआरचा तडाखेबाज फलंदाज सुनिल नारायणला क्लीन बोल्ड केलं. बुमराहच्या यॉर्करला डिफेंट करणं सुनील नारायणला जमलेच नाही.

सुनील नारायणला वाटलं की, चेंडू बाहेर जात आहे, त्यामुळे त्याने चेंडुला बॅटने फटका मारणं टाळलं आणि तो तेथेच चुकला. बाहेर जाणाऱ्या चेंडून हवेतच आपली चाल बदलत सुनीलाच्या दांड्याचा वेध घेतला. या इनस्विंग चेंडूने सुनील नारायच्या बेल्स हवेत उडवल्या. दरम्यान अशाप्रकारे बाद झाल्यानंतर सुनील नारायण परत एकदा गोल्डन डकचा बळी ठरला.

या विकेटनंतर सुनील नारायच्या नावावर एक लाजिरवाणा विक्रमही झालाय. पुरुषांच्या टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारा तो खेळाडू ठरला. सुनील नारायण तब्बल ४४ वेळा शुन्यावर बाद झालाय. पहा व्हिडिओ.

दरम्यान टी २०क्रिकेटमध्ये सर्वाधिक शून्यावर बाद झालेल्या खेळाडूंच्या यादीत सुनील नारायण ४४ वेळा बाद होत अव्वल स्थानावर आहे. या यादीत ॲलेक्स हेल्स हा ४३ वेळा शुन्यावर बाद झालाय. तर राशिद खान ( ४२ वेळा बाद झाला असून तो या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. यानंतर पॉल स्टर्लिंग चौथ्या स्थानावर असून तो ३२ वेळा बाद झालाय.

ग्लेन मॅक्सवेल देखील अनेकवेळा शुन्यावर बाद झाल्या मॅक्सवेल तब्बल ३१ वेळा शुन्यावर बाद झालाय. यानंतर जेसन रॉय ३१ वेळा बाद झाला असून तो पाचव्या स्थानावर आहे. याशिवाय नारायण हा आयपीएलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर (१६) वेळा शून्याचा बळी ठरलेला खेळाडू आहे.

KKR vs MI: बुमराहच्या चेंडूनं हवेतच बदलली 'चाल'; गुल झालेली दांडी पाहून सुनीलला काही सुचेना VIDEO
IPL 2024 MI vs KKR : अखेरच्या सामन्यातही मुंबईचा पराभव; केकेआर संघाचं प्लेऑफचं तिकीट कन्फर्म

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com