IPL 2024 Auction Explainer: आयपीएल लिलावात Unsold राहिलेल्या खेळाडूंचं काय होणार? काय आहे नियम?

IPL Auction Unsold Players: अन्सोल्ड झाले असले तरीदेखील आगामी आयपीएल हंगामात खेळू शकतात. कसं ?ते जाणून घ्या.
ipl 2024 auctions
ipl 2024 auctionssaam tv news
Published On

IPL Auction 2024, Explainer:

नुकताच आयपीएल २०२४ स्पर्धेसाठीचा लिलाव पार पडला. या लिलावात ३३३ खेळाडूंनी सहभाग घेतला होता. तर ७२ खेळाडूंवर बोली लागली. या खेळाडूंवर पैशांचा पाऊस पाडण्यात आला. या खेळाडूंना वगळलं तर इतर खेळाडू अन्सोल्ड राहिले.

या खेळाडूंमध्ये काही दिग्गज खेळाडूंचा देखील समावेश आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवणाऱ्या स्टीव्ह स्मिथ आणि जोश हेजलवूड सारख्या खेळाडूंना एकही खरेदीदार मिळाला नाही. हे खेळाडू अन्सोल्ड झाले असले तरीदेखील आगामी आयपीएल हंगामात खेळू शकतात. कसं ?ते जाणून घ्या.

दुबईत रंगलेल्या या लिलावात अनेक खेळाडूंवर ५ कोटींपेक्षाही अधिकची बोली लागली. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कवर कोलकाता नाईट रायडर्सने तब्बल २४.७५ कोटींची बोली लागली. तो या स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे.

तर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सवर सनरायझर्स हैदराबादने २०.५० कोटींची बोली लावली. या लिलावातील सुरुवातीच्या टप्प्यात काही खेळाडू अन्सोल्ड राहिले. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच एक्सेलेरेटेड राऊंडमध्ये अन्सोल्ड राहिलेल्या खेळाडूंवर पुन्हा एकदा बोली लावली गेली. या राऊंडमध्ये काही खेळाडूंवर कोट्यवधींची बोली लावली गेली. मात्र या राऊंडमध्येही अन्सोल्ड राहिलेले खेळाडू अजुनही आयपीएल स्पर्धेत खेळू शकतात.

ipl 2024 auctions
IND vs SA 3rd ODI: निर्णायक लढत जिंकण्यासाठी टीम इंडियाचा मास्टरप्लान! विराटच्या या खास प्लेअरला देणार प्लेइंग ११ मध्ये स्थान

अन्सोल्ड राहिलेले खेळाडू खेळू शकतात आयपीएल...

जर बोली लागलेल्या खेळाडूंपैकी एखादा खेळाडू दुखापतग्रस्त झाला किंवा काही कारणाने स्पर्धेतून माघार घेत असेल. अशा स्थितीत फ्रँचायजी अन्सोल्ड राहिलेल्या खेळाडूंना आपल्या संघात घेऊ शकतात.

इतकेच नव्हे तर अन्सोल्ड राहिलेल्या खेळाडूंना फ्रँचायजी सरावासाठी आपल्या संघात घेऊ शकतात. जर एखाद्या खेळाडूची रिप्लेसमेंट हवी असेल, तर त्याच खेळाडूला संघात स्थान देता येतं. (Latest sports updates)

ipl 2024 auctions
Ind vs Sa 3rd ODI, Weather Update: भारत- द.आफ्रिका निर्णायक वनडे सामना रद्द होणार? कसं असेल हवामान?

हे स्टार खेळाडू राहिले अन्सोल्ड..

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथसह, जोश हेजलवूड, जोश इंग्लिस, आदिल राशिद, जेम्स विंस, रासी वान डर दुसेन,बेन डकेट, जेमी ओवरटर्न या खेळाडूंना कोणीच आपल्या संघात स्थान दिलं नाही. या खेळाडूंची बेस प्राईज २ कोटी इतकी होती. तर १.५ कोटी बेस प्राईज असलेल्या ख्रिस जॉर्डन, जिमी निशम, कॉलिन मुनरो, जेसन होल्डर,डॅनियल सॅम्स यांना एकही खरिददार मिळाला नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com