PBKS vs RR Highlights: राजस्थानच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठा उलटफेर; मुंबई इंडियन्सचं धाबं दणाणलं

PBKS vs RR Match Result: आयपीएल २०२३ मधील ६६ वा सामना राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज संघात झाला. या सामन्यात राजस्थानने पंजाबवर ४ विकेट्सनी दणदणीत विजय मिळवला
PBKS vs RR IPL 2023 Match Result
PBKS vs RR IPL 2023 Match ResultIPL/Twitter

PBKS vs RR Match Result: आयपीएल २०२३ मधील ६६ वा सामना राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज संघात झाला. या सामन्यात राजस्थानने पंजाबवर ४ विकेट्सनी दणदणीत विजय मिळवला. शिमरोन हेटमायर हा राजस्थानच्या विजयाचा हिरो ठरला. त्याने मोक्याच्या क्षणी २८ चेंडूत ४६ धावांची खेळी केली. या विजयासह राजस्थानने गुणतालिकेत चौथ्या स्थानी झेप घेतली.

राजस्थानच्या विजयाने  मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) मोठा धक्का बसला असून त्यांची गुणतालिकेत पाचव्या स्थानावर घसरण झाली आहे. राजस्थान आणि मुंबईचे प्रत्येकी १४-१४ गुण झाले आहेत. मात्र, राजस्थानचा नेटरनरेट मुंबईपेक्षा चांगला असल्याने त्यांनी गुणतालिकेत बाजी मारली.

PBKS vs RR IPL 2023 Match Result
Mumbai Indians Playoffs: आरसीबी जिंकली म्हणून काय झालं, मुंबई अजूनही पोहचू शकते प्लेऑफमध्ये; जाणून घ्या समीकरण

जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडिमवर खेळवण्यात आलेल्या या सामन्यात राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी निर्णय घेतला. त्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या पंजाब किंग्जने राजस्थानसमोर विजयासाठी १८८ धावांचे आव्हान ठेवले होते.

या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानची खराब सुरूवात झाली. कगिसो रबाडाने दुसऱ्याच षटकात बटलरला शून्यावर माघारी पाठवलं. मात्र, त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या देवदत्त पडिकलने सलामीवर यशस्वी जैस्वालच्या मदतीने राजस्थानचा डाव सावरला. दोघांनी मिळून पंजाबच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. (Latest sports updates)

पडिकलने ३० चेंडूत ५१ धावा कुटल्या. त्याने ५ चौकार आणि ३ सणसणीत षटकार लगावले. मात्र, अर्शदीपला मोठा फटका मारण्याच्या नादात तो बाद झाला. पडिलकल पाठोपाठ संजू सॅमसन सुद्धा बाद झाला. त्याला राहुल चहरने बाद केले. संजूला केवळ दोनच धावा काढता आल्या. दुसरीकडे नॅथन अँलिसने यशस्वी जैस्वालला बाद करत राजस्थानला मोठा धक्का दिला. यशस्वी ५० धावा काढून बाद झाला.

एकवेळ राजस्थान हा सामना गमवणार असं वाटत असताना शिमरोन हेटमायर मैदानावर फलंदाजीसाठी आला त्याने रियान परागच्या मदतीने पंजाबच्या गोलंदाजांवर आक्रमण केलं. हेटमायरने २८ चेंडूत ४६ धावांची धडाकेबाज खेळी(Cricket News) केली. आपल्या खेळीत त्याने ३ चौकार आणि ३ षटकार ठोकले. याशिवाय रियान परागने सुद्धा २० धावांची खेळी केली.

विजयासाठी काही धावांची गरज असताना दोघेही बाद झाले. मात्र, त्यानंतर जुरेल आणि बोल्टने राजस्थानला विजय मिळवून दिला. पंजाबकडून कगिसो रबाडाने दोन विकेट्स घेतल्या. याशिवाय अर्शदीप सिंग, नॅथन अँलिस आणि राहुल चहर यांनी प्रत्येकी १-१ विकेट्स घेतल्या.

तत्पुर्वी प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या पंजाब किंग्जची (Sport News) सुरुवात चांगली झाली नव्हती. पंजाब किंग्जचे दोन्ही सलामीवीर शिखर धवन आणि प्रभसिमरन सिंग स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतले. यानंतर अथर्व तायडे आणि लियाम लिव्हिंगस्टोनही लवकर बाद झाले. मात्र, सॅम करण आणि जितेश शर्मा यांच्यात चांगली भागीदारी झाली. (Indian Premier League 2023)

जितेश शर्माने २८ चेंडूत ४४ धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्याने आपल्या खेळीत ३ चौकार आणि ३ षटकार मारले. तर सॅम करनने ३१ चेंडूत ४९ धावांची खेळी केली. त्याने आपल्या खेळीत ४ चौकार आणि २ षटकार मारले. याशिवाय शाहरुख खानने २३ चेंडूत ४१ धावांची धडाकेबाज खेळी केली. राजस्थानकडून नवदीप सैनीने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. याशिवाय अँडम झंपा आणि ट्रेंड बोल्टने प्रत्येकी १ गड्याला बाद केलं.

Edited by - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com