RR vs PBKS Match : आज मैदानात उतरणार सर्वात महागडा खेळाडू; कशी असेल राजस्थान-पंजाबची प्लेईंग-११

RR vs PBKS : आज आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज हे दोन संघ आमने-सामने येतील.
IPL 2023 RR vs PBKS Match
IPL 2023 RR vs PBKS MatchSaam TV

IPL 2023 RR vs PBKS Match : इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएलचा १६ वा हंगामा जोमात सुरू झाला आहे. यंदाच्या हंगामात कोणताही संघ कमजोर दिसत नाहीये. पहिल्या दोन तीन दिवसात जवळपास सर्वच संघांनी आपणच विजेतेपदाचे खास दावेदार असल्याचं दाखवून दिलं आहे. दरम्यान, आज आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज हे दोन संघ आमने-सामने येतील. (Latest sports updates)

आयपीएलच्या मागील मोसमात उपविजेतेपदावर समाधान मानावे लागलेल्या राजस्थान रॉयल्सने यंदाच्या मोसमाची सुरुवात विजयाने केली. दुसरीकडे शिखर धवनने कर्णधारपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पंजाब किंग्जनेही पहिल्याच सामन्यात विजय मिळवला.

IPL 2023 RR vs PBKS Match
Virender Sehwag On Prithvi Shaw : त्या शुबमन गिलकडे बघ!; पृथ्वी शॉवर विरेंद्र सेहवाग प्रचंड भडकला

आता दुसऱ्या सामन्यात पंजाबचा कर्णधार शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन दमदार प्लेइंग-11 घेऊन मैदानात उतरतील. या सामन्यात आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू सॅम करणही खेळणार आहे. संध्याकाळी 7 वाजता या सामन्याला सुरूवात होईल.

आयपीएल 2023 (IPL 2023) मिनी-लिलावात पंजाब किंग्जने इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू सॅम करनला 18.50 कोटी रुपयांची बोली लावून विकत घेतले. सॅम करणचा या मोसमातील हा दुसरा सामना आहे. पहिल्या सामन्यात त्याने 3 षटकात तब्बल 38 धावा खर्च करत फक्त 1 विकेट्स घेतली होती.

दोन्ही संघाचा इम्पॅक्ट प्लेअर कोण असणार?

आजच्या सामन्यात इम्पॅक्ट खेळाडूची भूमिका दोन्ही संघासाठी महत्वाची असणार आहे. त्यामुळे राजस्थान संघाने प्रथम फलंदाजी केली तर देवदत्त पडिकलचा प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश केला जाऊ शकतो. जर राजस्थानने प्रथम गोलंदाजी केली, तर पडिकलच्या जागी संदीप शर्मा किंवा मुरुगन अश्विनला संधी मिळू शकते. या दोघांचाही इम्पॅक्ट खेळाडू म्हणून वापर केला जाऊ शकतो.

दुसरीकडे पंजाब किंग्ज संघाने प्रथम फलंदाजी केल्यास भानुका राजपक्षेचा इम्पॅक्ट खेळाडू म्हणून वापर केला जाऊ शकतो. जर प्रथम गोलंदाजी आल्यास त्याच्या जागी ऋषी धवनला संधी दिली जाऊ शकते. या दोघांचाही इम्पॅक्ट खेळाडू म्हणून वापर केला जाऊ शकतो.  (Latest Marathi News)

अशी असू शकते दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग-11

राजस्थान रॉयल्स : यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (कर्णधार, यष्टिरक्षक), देवदत्त पडिकल/संदीप शर्मा (इम्पॅक्ट प्लेअर), शिमरॉन हेटमायर, रियान पराग, जेसन होल्डर, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, केएम आसिफ आणि युझवेंद्र चहल.

पंजाब किंग्स : प्रभसिमरन सिंग, शिखर धवन (कर्णधार), भानुका राजपक्षे/ऋषी धवन (इम्पॅक्ट प्लेयर), जितेश शर्मा (विकेटकीपर), सिकंदर रझा, सॅम करण, शाहरुख खान, हरप्रीत ब्रार, राहुल चहर, अर्शदीप सिंग आणि कागिसो रबाडा.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com