PBKS vs MI Score: लिव्हिंगस्टोनने मुंबईच्या गोलंदाजांची पिसेच काढली; पंजाबने उभारला धावांचा डोंगर

Mumbai Indians vs Punjab Kings IPL 2023 Match: पंजाब किग्जने प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्ससमोर विजयासाठी २१५ धावांचं लक्ष ठेवलं आहे.
Mumbai Indians vs Punjab Kings IPL 2023 Match
Mumbai Indians vs Punjab Kings IPL 2023 MatchTwitter
Published On

Mumbai Indians vs Punjab Kings IPL 2023 Match: लिम लिव्हिंगस्टोनची ४२ चेंडूत नाबाद ८२ धावांची धडाकेबाज खेळी. त्याला जितेश शर्माने २७ चेंडूत नाबाद ४९ धावांच्या दिलेल्या साथीच्या जोरावर पंजाब किग्जने प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्ससमोर विजयासाठी २१५ धावांचं लक्ष ठेवलं आहे. आयपीएलमध्ये आज रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सचा सामना शिखर धवनच्या पंजाब किंग्ज संघाविरोधात होत आहे. (Latest sports updates)

Mumbai Indians vs Punjab Kings IPL 2023 Match
Ayush Badoni Celebration: लखनऊचे इतर फलंदाज ढेर, एकटा बदोनी ठरला शेर, अर्धशतक झळकावताच केलं हटके सेलिब्रेशन

गेल्या सामन्यात पंजाबने मुंबईला घरच्या मैदानावर पराभूत केलं होतं. आता सामना पंजाबच्या मैदानावर होत असल्याने पराभवाचा वचपा काढण्यासाठी रोहित शर्माने प्रथम नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला होता.

मात्र पंजाबनेही पॉवर प्लेमध्ये दमदार सुरूवात केली. अर्शद खानने प्रभसिमरन सिंगला ९ धावांवर बाद केल्यानंतर शिखर धवन आणि मॅथ्यू शॉर्ट यांनी आक्रमक फलंदाजी करत पंजाबला अर्धशतक पार करून दिले.

मात्र, ही जोडी अर्धशतकी भागीदारी पूर्ण करणार इतक्यात पियुष चावलाने शिखर धवनला बाद केलं. शिखरने २० चेंडूत ३० धावांची खेळी केली. शिखर धवन बाद झाल्यानंतर मॅथ्यू शॉर्टही २६ चेंडूत २७ धावा करून बाद झाला.

त्यानंतर मात्र लिम लिव्हिंगस्टोन आणि जितेश शर्मा यांनी आक्रमक फलंदाजी करत पंजाबला २०० धावांच्या पार पोहचवले. दोघांनी मिळून शेवटच्या ९ षटकात मुंबईच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. सुरूवातीच्या १० षटकापर्यंत मुंबईच्या गोलंदाजांची सामन्यावर पकड होती. मात्र, शेवटच्या ९ षटकात त्यांनी १२० हून अधिक धावा खर्च केल्या.

पंजाबकडून लिम लिव्हिंगस्टोन ४२ चेंडूत नाबाद ८२ धावांची धडाकेबाज खेळी. त्याला जितेश शर्माने २७ चेंडूत नाबाद ४९ धावा करून चांगलीच साथ दिली. लिव्हिंगस्टोनने आपल्या खेळीत ७ चौकार आणि ५ षटकार ठोकले.

तर जितेश शर्माने ५ चौकारासह २ षटकार खेचले. मुंबईकडून पियूष चावलाने ४ षटकात २९ धावा देत २ गड्यांना बाद केलं. तर अर्शद खानने १ विकेट्स घेतली. दोघांव्यतिरिक्त मुंबईच्या कोणत्याही गोलंदाजाला यश मिळालं नाही.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com