

IPL 2023 GT VS CSK Highlights: आयपीएल २०२३ स्पर्धेतील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे.
हा सामना चेन्नई सुपर किंग्ज संघाने ५ विकेट्सने गमावला आहे. या सामन्यात पहिल्यांदाच इम्पॅक्ट प्लेअरचा वापर करण्यात आला होता. मात्र दोघांनाही हवी तशी कामगिरी करता आली नाही.
इम्पॅक्ट प्लेअरचा झिरो इम्पॅक्ट..
आयपीएल २०२३ स्पर्धेत इम्पॅक्ट प्लेअरचा नवीन नियम लागू करण्यात आला आहे. या नियमासानुर सर्व संघांना सामना सुरु असताना १२ व्या खेळाडूला संघात समाविष्ट करण्याची संधी मिळणार आहे.
त्यामुळे गरज असताना प्लेइंग ११ मधील एका खेळाडूला बाहेर करून अतिरिक्त गोलंदाजाला किंवा फलंदाजाला संघात स्थान देता येणार आहे.
इम्पॅक्ट प्लेअर नियमाचा वापर करणारा एमएस धोनी हा आयपीएल इतिहासातील पहिलाच कर्णधार ठरला आहे. पहिल्या डावात फलंदाजी केल्यानंतर एमएस धोनीने अंबाती रायुडूला विश्रांती देत तुषार देशपांडेला संधी दिली होती. (Latest sports updates)
मात्र त्याला या संधीचा लाभ घेता आला नाही. त्याने गोलंदाजी करताना मोक्याच्या क्षणी अतिरिक्त धावा दिल्या. तसेच अंतिम षटकात ८ धावा देखील त्याला वाचवत्या आल्या नाहीत. अवघ्या ३.२ षटकात त्याने ५१ धावा खर्च केल्या.
यादरम्यान त्याला केवळ १ गडी बाद करता आला. या सामन्यात तो सर्वात महागडा गोलंदाज ठरला.
तर या सामन्याचा पहिला डाव सुरु असताना गुजरात टायटन्स संघातील अनुभवी फलंदाज केन विलियमसन सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करताना दुखापग्रस्त झाला होता. त्याच्याऐवजी युवा फलंदाज साई सुदर्शनला इम्पॅक्ट प्लेअर म्ह्णून संधी दिली गेली होती. मात्र त्याला या सामन्यात इम्पॅक्ट पडेल अशी खेळी करता आली नाही. तो अवघ्या २२ धावा करत माघारी परतला.
इम्पॅक्ट प्लेअरचा नियम काय सांगतो?
या नियमानुसार आता ११ ऐवजी १२ खेळाडू खेळताना दिसून येणार आहेत. सामना सुरु असताना कुठल्याही खेळाडूला बाहेर करता येणार तसेच त्याच्या ऐवजी दुसऱ्या खेळाडूला संधी देता येणार आहे.
यासाठी दोन्ही संघातील कर्णधारांना नाणेफेक होण्यापूर्वी ५-५ खेळाडूंची यादी द्यावी लागणार आहे. कर्णधाराने निवडलेल्या या खेळाडूंपैकी एका खेळाडूचा इम्पॅक्ट प्लेअर म्हणून वापर करता येणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.