IPL 2023: 'प्रिय माही...' सामन्याआधीच चाहते भावूक! लाडक्या धोनीला दिला स्पेशल मेसेज; ह्रदयस्पर्शी व्हिडिओ चूकवू नका

Tata IPL Ms Dhoni Fans Viral Video: या व्हिडिओमध्ये पिच क्युरेटरपासून सुरक्षा रक्षकापर्यंत सर्वजण धोनीबद्दल बोलताना दिसत आहेत..
Ms Dhoni Fans Viral Video
Ms Dhoni Fans Viral VideoSaamtv

Tata IPL Final 2023: इंडियन प्रीमिअर लीग २०२३ (IPL2023) ची फायनल आज नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स या दोन तगड्या संघांमध्ये होणार आहे. गुजरातला जेतेपद कायम राखून इतिहास घडविण्याची, तर चेन्नईला मुंबई इंडियन्सच्या ५ जेतेपदांची बरोबरी करण्याची संधी आहे.

परंतु महेंद्रसिंग धोनीचे चाहते मात्र त्याच्या लाडक्या माहीसाठी चांगलेच भावूक झाले आहेत. धोनीचा हा शेवटचा सामना असल्याचेही बोलले जात आहे. म्हणूनच चाहत्यांची चिंता वाढली असू सध्या एका सुंदर व्हिडिओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. ज्यामध्ये धोनीचे चाहते चांगलेच भावूक झाल्याचे पाहायला मिळत आहेत.. (Ms Dhoni Fans Viral News)

Ms Dhoni Fans Viral Video
IPL Final 2023 CSK vs GT: धोनीला हरवणं सोप्प नव्हं! CSK च्या 'या' पाच गोष्टी ठरणार 'हार्दिक'साठी घातक?

महेंद्रसिंग धोनी. (Mahendra Singh Dhoni) आयपीएलचं नव्हे तर क्रिकेटच्या मैदानावरील सम्राट. आयपीएलमध्ये महेंद्रसिंग धोनीच्या लोकप्रियतेने सर्वच रेकॉर्ड मोडित काढले आहेत. प्रत्येक मैदानावर धोनीच्या तुफान लोकप्रियतेची झलक पाहायला मिळत असून चाहते त्याची एक झलक पाहण्यासाठी मैदानावर गर्दी करत आहेत. आयपीएलमध्ये धोनीने चेन्नईकडून खेळताना १० व्यांदा अंतिम फेरी गाठण्याचा विक्रम केला आहे.

Ms Dhoni Fans Viral Video
Maval News: जुन्या मुंबई पुणे रोडवर रोजच ट्राफिक जाम; पोलीस मात्र पावत्या फाडण्यात मग्न

व्हिडिओ व्हायरल...

धोनीच्या याच सर्वोच्च योगदानामुळे चेन्नई सुपर किंग्ससाठी महेंद्रसिंग धोनी सर्वात महत्वाचा आणि स्पेशल खेळाडू ठरतो. सध्या सामन्याआधी धोनीच्या चाहत्यांचा एक खास व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. जो पाहून नेटकरीही भावूक झाले आहेत.

काय आहे व्हिडिओ....

आजच्या सामन्यापूर्वी आयपीएलच्या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर धोनीच्या फॅन्सनी धोनीविषयी प्रेम व्यक्त केले आहे. व्हिडिओमध्ये चाहते धोनीबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त करताना दिसत आहेत. यामध्ये एक चाहता  धोनीची शेवटची आयपीएल स्पर्धा आहे. मला माहिती नाही हे खरं आहे की खोटं पण धोनीसारखा खेळाडू भविष्यात कधीच पाहायला मिळणार नाही.” असे म्हणत त्याचे कौतुक करत आहे.

तर दुसऱ्या एका चाहत्याने धोनी खूप शांत आणि कूल आहे. तो लहानपणापासून माझे प्रेरणास्थान आहे, असे म्हणत त्याच्या लाडक्या माहीचे कौतुक केले आहे. या व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांनीही जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. या व्हिडिओमध्ये पिच क्युरेटरपासून सुरक्षा रक्षकापर्यंत सर्वजण धोनीबद्दल बोलताना दिसत आहेत..

CSK कडूनही धोनीसाठी खास ट्विट...

धोनीचा हा शेवटचा आयपीएल असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर सीएसकेने धोनीचे आभार मानले आहेत. "माझ्या प्रिय थाला, प्रत्येक वेळी जेव्हा तू मैदानात पाऊल ठेवले तेव्हा तू आम्हाला फुलपाखरे दिलीत, "असे सिएसकेने म्हटले आहे. धोनीने अनेक नवीन खेळाडूंना संधी दिली. व त्यांच्या खेळात सुधारणा केली, असा त्याचा अर्थ होतो. यामुळे धोनीच्या चाहत्यांमध्ये त्याच्याविषयी आदर वाढत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com