IPL 2022: चेन्नईसमोर मुंबईचं तगडं आव्हान; आज हारली तर विषय संपला!

चेन्नईला अजूनही शर्यतीत स्वत:ला कायम ठेवायचे असेल, तर...
MS Dhoni- Rohit Sharma
MS Dhoni- Rohit SharmaSaam TV
Published On

IPL 2022 मध्ये, आज लीगच्या इतिहासातील दोन सर्वात यशस्वी संघ एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडलेल्या मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) सामना महेंद्रसिंग धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जशी होणार आहे. मुंबईसाठी लीगचे उर्वरित सामने केवळ सन्मानाच्या लढाया असणार आहेत. चेन्नईसाठी हा सामना अजूनही प्लेऑफच्या शर्यतीत स्वत:ला कायम राखण्यासाठीचा सामना आहे. चेन्नई अंतिम-4 मध्ये पोहोचण्याची शक्यता खूपच कमी असणार आहे. जर मुंबईने त्यांना हरवले तर चेन्नई प्लेऑफच्या शर्यतीतून पूर्णपणे बाहेर पडेल. चेन्नईला अजूनही शर्यतीत स्वत:ला कायम ठेवायचे असेल, तर त्यांना सर्व सामने जिंकावे लागणार आहेत.

मुंबईकडून पराभूत झाल्यास चेन्नई स्पर्धेतून बाहेर पडेल. चेन्नईने मागील सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा 91 गुणांनी पराभव केला होता. त्यामुळे चेन्नईचा संघ फॉर्ममध्ये आहे. सलामीवीर डेव्हन कॉनवे उत्कृष्ट फॉर्ममध्ये असून त्याने सलग तीन अर्धशतके झळकावली आहेत. त्याने दिल्लीविरुद्ध 87 धावा केल्या, तरीही त्याला सलामीचा जोडीदार ऋतुराज गायकवाडकडून पाठिंबा अपेक्षित असणार आहेत.

MS Dhoni- Rohit Sharma
आम आदमी पक्षाची मुंबई निवडणुकीत एन्ट्री; मुंबईकरांसाठी केल्या मोठ्या घोषणा

रवींद्र जडेजा स्पर्धेतून बाहेर!

चेन्नईसाठी एक वाईट बातमी म्हणजे रवींद्र जडेजा जखमी झाला आहे. तो दिल्लीविरुद्ध खेळला नाही आणि टाईम्स ऑफ इंडिया या इंग्रजी वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, रवींद्र जडेजाच्या दुखापतीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे, परंतु अशा परिस्थितीत तो उर्वरित सामन्यांमध्ये चेन्नईच्या संघात दिसणार नाही, अशी शक्यता आहे. चेन्नईला मोठी धावसंख्या उभारावी लागणार असून त्यासाठी सर्व फलंदाजांना चांगली कामगिरी करावी लागणार आहे. गेल्या वेळी दोन्ही संघांच्या सामन्यात धोनीने आपली फिनिशिंग शैली दाखवत विजय मिळवला होता.

चेन्नईच्या गोलंदाजीवरही लक्ष ठेवा

सीएसकेने दिल्लीला 117 धावांत गुंडाळले. मोईन अलीने तीन बळी घेतले तर युवा वेगवान गोलंदाज मुकेश चौधरी आणि सिमरनजीत सिंग यांनीही चांगली कामगिरी केली. तिघांनाही एकत्र चांगली कामगिरी करावी लागेल तर फिरकीपटू महिष तेक्षानाची चार षटकेही सामन्याचा मार्ग बदलू शकतात. ड्वेन ब्राव्होच्या कामगिरीवरही बरेच काही अवलंबून असेल.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com