मुंबई: लवकरच राज्यातील मुदत संपलेल्या महापालिकेच्या निवडणुका जाहीर होणार आहेत. त्यामुळे राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. यापैकी राज्यातील आणि देशातील महत्त्वाची समजली जाणारी महापालिका म्हणजे मुंबई महापालिका (Brihanmumbai Municipal Corporation). दिल्ली आणि पंजाब विधानसभेमध्ये (Punjab) आपला डंका वाजवल्यानंतर आता आम आदमी पक्ष मुंबई महापालिकेची निवडणूक लढवणार आहे.
निवडूक लढण्याचे संकेत दिल्यानंतर आपने मोठ्या घोषणा केल्या आहेत. बीएमसीत आलो तर आम्ही मुंबईकरांना वीज मोफत देणार, पाणी मोफत देणार, महापालिका निवडणुकीकरता कुणाशीही युती करणार नाही. १० वर्षे काम करतोय, ४० हजार कार्यकर्ते आहेत. उद्यासुद्धा निवडणूका लढवायला तयार आहोत, त्याचबरोबर सर्व जागांवर निवडणूक लढवायला तयार असल्याचे आप ने म्हटले आहे.
ओबीसी आरक्षणाशिवाय (OBC Reservation) निवडणूका होऊ नयेत. मुंबईला मूलभूत सेवा देण्याचा आमचा प्रयत्न राहिल. सफाई, वीज, पाणी, आरोग्य , शिक्षण यांवर लक्ष केंद्रीत करणार आहोत. महाराष्ट्रात सर्व निवडणूका लढवणार आहोत, मात्र मुंबई हे आमच्याकरिता प्राधान्य राहणार आहे. भ्रष्टाचारविरोध हा आमचा अजेंडा राहील असेही पुढे म्हणाले आहेत. भाजप वारंवार मुंबईतील नालेसफाईवर प्रश्नचिन्ह उपस्थीत करत आहे. आता भाजप पाठोपाठ 'आप'कडूनही मुंबईतील नालेसफाईवर प्रश्नचिन्ह उपस्थीत केले आहे. मुंबईतील नालेसफाईचे दावे खोटे असल्याचा आरोप आप च्या प्रिती मेनन यांनी केला आहे.
मुंबईत यंदाच्या पावसाळ्यात पुन्हा मुंबई तुंबली तर जबाबदार अधिकारी, राजकारण्यांवर क्रिमीनल निग्लीजन्सच्या केसेस दाखल कराव्यात. भाजपनं गेल्या ५ वर्षात विरोधी पक्षाचीही जागा घेतली नाही. आता मे मध्ये मीडियासोर येऊन नालेसफाई बाबत बोलतायेत. आणि हे च भाजप इतके वर्षे शिवसेनेसोबत महापालिकेत सत्तेत होते असेही प्रिती मेनन म्हणाल्या आहेत.
Edited By: Pravin Dhamale
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.