

IND VS WI: कसोटी सामना वेस्ट इंडिजमध्ये सुरु असेल आणि तुम्हाला जर विचारलं की, वेस्ट इंडिजमध्ये सर्वाधिक गडी बाद करणारे गोलंदाज कोण? जर असा प्रश्न तुम्हला कोणी विचारला तर नक्कीच तुम्ही वेगवान गोलंदाजांचं नाव घ्याल.
मात्र भारतीय संघाच्या बाबतीत जरा उलट आहे. भारतीय संघ जेव्हा जेव्हा वेस्ट इंडिजमध्ये खेळण्यासाठी गेला आहे, त्यावेळी वेगवान गोलंदाज नव्हे तर फिरकी गोलंदाजांचा दबदबा पाहायला मिळाला आहे. सर्वाधिक गडी बाद करणाऱ्या टॉप ३ गोलंदाजांच्या यादीत २ फिरकी गोलंदाज आहेत.
वेस्टइंडिजमध्ये खेळताना सर्वाधिक गडी बाद करणारे टॉप ३ गोलंदाज..
एस वेंकटराघवन
भारतीय संघाचे माजी फिरकीपटू एस वेंकटराघवन हे १९७१ मध्ये पहिल्यांदा भारताबाहेर कसोटी सामना खेळण्यासाठी गेले होते. त्यांनी वेस्ट इंडिजसंघाविरुद्ध झालेल्या ५ कसोटी सामन्यांमध्ये २२ गडी बाद केले होते.
या दौऱ्यावर भारतीय संघाने १-० ने जोरदार विजय मिळवला होता. भारतीय संघाला एकमेव कसोटी सामना जिंकवून देण्यात एस वेंकटराघवन यांनी मोलाची भूमिका बजावली होती. त्यांनी या सामन्यातील दुसऱ्या डावात ९५ धावा खर्च करत ५ गडी बाद केले होते. (Latest sports updates)
इशांत शर्मा:
इशांत शर्मा हा वेस्ट इंडिजमध्ये खेळताना भारतीय संघाचा दुसरा सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. त्याने वेस्ट इंडिजमध्ये खेळताना ४१ गडी बाद केले आहेत. वेस्ट इंडिजमध्ये खेळताना त्याचा रेकॉर्ड दमदार राहिला आहे.
त्याच्या नावे ३ वेळेस ५ गडी बाद करण्याची नोंद आहे. इशांत शर्माने एकाच सामन्यात गोलंदाजी करताना १० गडी बाद करण्याचा कारनामा वेस्ट इंडिजमध्येच केला होता. हा कारनामा त्याने दुसऱ्याच कसोटी सामन्यात केला होता. मात्र आगामी कसोटी मालिकेत तो खेळताना दिसून येणार नाही.
अनिल कुंबळे:
अनिल कुंबळे हे दिग्गज गोलंदाजांपैकी एक आहेत. त्यांनी केवळ भारतात नव्हे तर भारताबाहेरही आपल्या गोलंदाजीच्या बळावर भारतीय संघाला विजय मिळवून दिले आहेत. वेस्ट इंडिजमध्ये खेळताना त्यांनी ४५ गडी बाद केले आहेत.
वेस्ट इंडिजमध्ये त्यांनी ५ वेळेस ५ गडी बाद करण्याचा कारनामा केला आहे. अनिल कुंबळे हे भारताचे सर्वात यशस्वी फिरकी गोलंदाज आहेत. त्यांनी १३२ कसोटी सामन्यांमध्ये ६१९ गडी बाद केले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.