Team India: रोहित कॅप्टन बनताच 'या' 3 खेळाडूंची कारकीर्द जवळ जवळ संपलीच;विराटचा खास असलेल्या खेळाडूचा समावेश

Rohit Sharma Captaincy: भारतीय संघात ३ असे खेळाडू देखील आहेत, ज्यांना रोहितने संघात खुप कमी संधी दिली आहे.
team india
team indiasaam tv
Published On

Indian Cricket Team, Rohit Sharma Captaincy: भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा हा आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार आहे. मात्र त्याला आतापर्यंत आयसीसीची एकही ट्रॉफी जिंकता आली नाही. काही दिवसांपूर्वी त्याला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेची ट्रॉफी जिंकण्याची संधी मिळाली होती. मात्र ही संधी देखील त्याने गमावली आहे.

ओव्हलच्या मैदानावर पार पडलेल्या या सामन्यात भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला आहे.

आता तो आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसुन येणार आहे. या स्पर्धेत त्याच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष लागुन असणार आहे. दरम्यान भारतीय संघात ३ असे खेळाडू देखील आहेत, ज्यांना रोहितने संघात खुप कमी संधी दिली आहे.

team india
Emerging Asia Cup 2023: एकदम झक्कास...! टीम इंडियानं आशिया कप जिंकला, बांगलादेश संघाला लोळवलं

रवी बिश्नोई:

रवी बिश्नोईला आतापर्यंत हवी तशी कामगिरी करता आली नाही. त्याला २०२२ मध्ये झालेल्या आशिया कप स्पर्धेत संधी मिळाली होती. या स्पर्धेत त्याने पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमची विकेट मिळवली होती. चमकदार कामगिरी करुनही त्याला भारतीय संघात कमबॅक करण्याची संधी मिळाली नाही.

त्याला शिखर धवनच्या नेतृत्वाखाली खेळताना भारतीय संघात पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. आशिया चषक स्पर्धेत केलेल्या कामगिरीच्या बळावर त्याला टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी संधी मिळू शकते असे वाटत होते. मात्र रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या संघात रवी बिश्नोईला संधी दिली गेली नव्हती.

team india
Asia Cup 2023: आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची प्लेइंग ११ जाहीर! माजी कर्णधाराला मिळू शकते मोठी जबाबदारी

युजवेंद्र चहल :

युजवेंद्र चहल हा भारतीय संघातील प्रमुख फिरकी गोलंदाजांपैकी एक आहे. मात्र आता तो प्लेइंग ११ मध्ये स्थान मिळवण्यासाठी देखील संघर्ष करताना दिसुन येत आहे. युजवेंद्र चहलने आयपीएल स्पर्धेत विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. तो टी-२० क्रिकेटमधील भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. मात्र तरीदेखील त्याला टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान दिलं गेलं नव्हतं. (Latest sports updates)

team india
Team India: 'पैसे कमावणं म्हणजेच सर्व काही नसतं..' वर्ल्ड कप विजेत्या खेळाडूची BCCI च्या कारभारावर जोरदार टीका..

ईशान किशन:

देशांतर्गत क्रिकेटमध्ये झारखंड संघाचे प्रतिनिधित्व करणारा ईशान किशन हा आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. त्याने अनेकदा संघाला चांगली सुरुवात करुन दिली आहे.

आयपीएल स्पर्धेत तो मुंबई इंडियन्स संघासाठी रोहित शर्मासोबत डावाची सुरुवात करतो. असं असताना देखील त्याला आशिया चषक आणि टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान दिलं गेलं नव्हतं.

टी-२० वर्ल्ड कप २०२२ स्पर्धेत यष्टिरक्षक फलंदाज म्हणून केएल राहुलला संधी दिली गेली होती. मात्र या स्पर्धेत त्याला केवळ १२८ धावा करता आल्या होत्या. आता आगामी स्पर्धांमध्ये रोहित कोणाला संधी देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com