P R Sreejesh Retirement: टीम इंडियाची भिंत निवृत्त! श्रीजेशला भारतीय खेळाडूंकडून भावनिक निरोप- VIDEO

P R Sreejesh Retirement Video: भारतीय हॉकी संघाचा गोलकिपर श्रीजेशने निवृत्तीची घोषणा केली आहे. दरम्यान त्याला भावनिक निरोप देण्यात आला आहे. ज्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय.
P R Sreejesh Retirement: टीम इंडियाची भिंत निवृत्त! श्रीजेशला भारतीय खेळाडूंकडून भावनिक निरोप- VIDEO
sreejeshtwitter
Published On

भारतीय हॉकी संघाची भिंत म्हणून ओळखला जाणारा पीआर श्रीजेशने हॉकीला रामराम ठोकला आहे. भारताने कांस्यपदकासाठी झालेल्या सामन्यात स्पेनला २-१ न धूळ चारली आणि सलग दुसऱ्यांदा भारताला कांस्यपदक जिंकून दिलं. एकीकडे भारतीय संघाच्या विजयाचा आनंद आहे. तर दुसरीकडे श्रीजेश यापूढे भारतीय संघासाठी खेळताना दिसणार नाही, हे दु:खही भारतीय फॅन्सला पचवावं लागणार आहे.

श्रीजेश गोलकीपिंगला असला, की विरोधी संघातील खेळाडूंची धडधड वाढायची. कितीही प्रयत्न केले, तरी गोल होणं कठीणच होतं. श्रीजेश गोलकीपर असताना भारतीय संघाने सलग २ वेळेस कांस्यपदकाला गवसणी घातली. यापूर्वी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतही त्याने शानदार गोलकीपिंग केली होती. या शानदार कामगिरीच्या बळावर भारतीय संघाने जर्मनीला पराभूत करत कांस्यपदकावर नाव कोरलं होतं. सलग २ दुसऱ्यांदा कांस्यपदक पटकावण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापू्र्वी १९६८ आणि १९७२ मध्येही भारतीय संघाने सलग २ ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये कांस्यपदकं पटकावली होती.

P R Sreejesh Retirement: टीम इंडियाची भिंत निवृत्त! श्रीजेशला भारतीय खेळाडूंकडून भावनिक निरोप- VIDEO
Paris Olympics 2024: नीरज चोप्राचं सुवर्णपदकावर लक्ष; भारतीयांच्या अपेक्षा उंचावल्या, काय आहे पॅरिस ऑलिम्पिकचं आजचं वेळापत्रक?

भारतीय संघाच्या भिंतीला निरोप

श्रीजेशचा जन्म केरळ राज्यातील एर्नाकुलममध्ये झाला. लहानपणापासून हॉकीची आवड असलेल्या श्रीजेशने २००६ मध्ये भारतीय संघासाठी पदार्पण केलं होतं. तेव्हापासून ते आतापर्यंत तो गोलकिपर म्हणून मजबूत भिंतीसारखा उभा राहिला. त्याने भारतीय संघासाठी ३०० हून अधिक सामने खेळले. त्याला भारतीय संघाकडून ४ ऑलिम्पिक स्पर्धा खेळण्याची संधी मिळाली. यादरम्यान भारताने २ स्पर्धांमध्ये कांस्यपदकावर नावं कोरलं.

P R Sreejesh Retirement: टीम इंडियाची भिंत निवृत्त! श्रीजेशला भारतीय खेळाडूंकडून भावनिक निरोप- VIDEO
Paris Olympics 2024 : ऑलिम्पिक पदकतालिकेत अमेरिका अव्वल, चीन दुसरा, भारत कितव्या क्रमांकावर?

श्रीजेशला २०२१ मध्ये मेजर ध्यानचंद खेळ रत्न पुरस्कार देण्यात आला होता. भारताला कांस्यपदक जिंकून दिल्यानंतर त्याने निवृ्त्ती घेतली आहे. ही स्पर्धा सुरु होण्यापूर्वीच त्याने निवृत्ती घेत असल्याची माहिती दिली होती. आता कांस्यपदक जिंकल्यानंतर भारतीय खेळाडूंनी त्याला भावनिक निरोप दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com