IPL 2024: IPL मध्ये खेळणार १६५ भारतीय खेळाडू, ५६ खेळांडूबाबत धक्कादायक माहिती समोर

IPL 2024 News in Marathi: आयपीएल ही क्रिकेट विश्वातील सर्वात मोठी क्रिकेट लीग स्पर्धा म्हणून ओळखली जाते. या स्पर्धेने अनेकांचं करिअर बनवलं आहे. तर काहींच्या करिअरला पूर्णविराम देखील दिला आहे.
IPL Cricket Ground
IPL Cricket Ground yandex

Indian Cricketers vs Ranji Trophy:

आयपीएल ही क्रिकेट विश्वातील सर्वात मोठी क्रिकेट लीग स्पर्धा म्हणून ओळखली जाते. या स्पर्धेने अनेकांचं करिअर बनवलं आहे. तर काहींच्या करिअरला पूर्णविराम देखील दिला आहे. या स्पर्धच्या १७ व्या हंगामाला येत्या २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामन्याने या स्पर्धेला प्रारंभ होणार आहे.

तर काही दिवसांपूर्वीच रणजी ट्रॉफीला दुर्लक्ष करुन आयपीएलला प्राधान्य देणाऱ्या खेळाडूंना बीसीसीआयने वॉर्निंग दिली होती. तर इशान किशन आणि श्रेयस अय्यरला सेन्ट्रल कॉन्ट्रॅक्टमधून बाहेर केलं आहे. दरम्यान एका अहवालात धक्कादायक माहिती समोर आली आहे.

IPL Cricket Ground
IPL 2024, RCB Squad: स्टार फलंदाजांची भरमार; मात्र ही एक चूक RCB ला संपूर्ण हंगामात नडणार

इंडियन एक्स्प्रेसच्या अहवालात धक्कादायक माहिती समोर आली आहे. या अहवालात म्हटलं गेलं आहे की, १६५ भारतीय खेळाडूंनी आयपीएलसाठी नाव नोंदणी केली. या १६५ पैकी ५६ खेळाडू रणजी ट्रॉफी स्पर्धेतील एकाही सामन्यासाठी उपलब्ध नव्हते. तर २५ खेळाडू केवळ १ सामना खेळले. रणजी ट्रॉफी स्पर्धेतील सामने ४ दिवसांचे असतात आणि आयपीएलचा १ सामना केवळ ४ तासांचा असतो. या सामन्यासाठी खेळाडू रणजी ट्रॉफीपासून स्वत:ला दूर ठेवत असल्याचं चित्र दिसून येत आहे.

युवा खेळाडू लीग क्रिकेटला जास्त प्राधान्य देताना दिसून येत आहेत. त्यांना कसोटी क्रिकेटकडे आकर्षित करण्यासाठी बीसीसीआयने कसोटी क्रिकेटचं मानधन वाढवण्याची घोषणा केली. नव्या स्किमनूसार, एका हंगामात ९ कसोटी सामने खेळणाऱ्या खेळाडूंना ३० लाख रुपये आणि जे खेळाडू प्लेइंग ११ मधून बाहेर असतील अशा खेळाडूंना १५ लाख रुपये दिले जाणार आहेत. तर एका हंगामात ७५ टक्के सामने खेळणाऱ्या खेळाडूंना ४५ लाख रुपये आणि प्लेइंग ११ मधून बाहेर असणाऱ्या खेळाडूंना २२. ५ लाख रुपये दिले जाणार आहेत. मात्र तरीदेखील खेळाडू कसोटी क्रिकेटला प्राधान्य न देता टी-२० क्रिकेटकडे अधिक आकर्षित होताना दिसून येत आहेत. (Cricket news in marathi)

IPL Cricket Ground
New Rule In IPL 2024: गोलंदाजांची चांदीच चांंदी! IPL स्पर्धेसाठी BCCI कडून नवा नियम लागू

या स्टार खेळाडूंचा समावेश...

आगामी हंगामात हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्स संघाचं नेतृत्व करताना दिसून येणार आहे. तर त्याच भाऊ कृणाल पंड्या हे दोघेही बडोदा संघाकडून खेळतात. मात्र २०१८ नंतर हे दोघेही बडोदासाठी रणजी ट्रॉफी खेळताना दिसून आलेले नाहीत. ताशी १५० च्या गतीने गोलंदाजी करणारा उमरान मलिक आणि रसिक सलम दर हे दोघेही आयपीएल खेळतात. मात्र दोघेही रणजी ट्रॉफी खेळताना दिसून आलेले नाहीत.

दिपक चाहर आणि राहुल चाहर हे दोघे राजस्थान संघाचं प्रतिनिधित्व करतात. मात्र हे दोघेही आपल्या संघासाठी रणजी सामना खेळण्यासाठी मैदानात उतरले नाहीत. काही खेळाडू तर फिट नसल्यामुळे रणजी ट्रॉफी स्पर्धेतून बाहेर होते.आता तेच खेळाडू आयपीएल स्पर्धेत खेळताना दिसून येणार आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com