Anshuman Gaekwad Death: डोक्याला मार लागला तरीही हिंमत न हारता जिंकली मॅच, गावस्करांनी सांगितला अंशुमन यांच्यासोबतचा 'तो' किस्सा

Indian Cricketer Sunil Gavaskar Shared Special Memory: भारताचे माजी क्रिकेटपटू अंशुमन गायकवाड यांचं निधन झालंय. यापूर्वी सुनील गावस्कर यांनी अंशुमन गायकवाड यांच्याबद्दल एक विशेष अनुभव शेअर केला होता.
भारताचे माजी क्रिकेटपटू अंशुमन गायकवाड
Anshuman Gaekwad DeathSaam Tv
Published On

भारताचे माजी क्रिकेटपटू अंशुमन गायकवाड यांनी बुधवारी ३१ जुलै रोजी वयाच्या ७१ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. बऱ्याच दिवसांपासून गायकवाड ब्लड कॅन्सरने त्रस्त होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी देखील अंशुमन गायकवाड निधनावर शोक व्यक्त केलाय. गायकवाड यांच्या निधनाने संपूर्ण क्रिकेट विश्वात शोककळा पसरली आहे. अंशुमन गायकवाड १९९७ ते १९९९ या काळात भारताचे प्रशिक्षक होते.

अंशुमन गायकवाड यांच्याबद्दल विशेष अनुभव

मागील वर्षी अंशुमन गायकवाड यांचं 'Guts Amidst Bloodbath' हे आत्मचरित्र प्रदर्शित झालं होतं. यादरम्यान त्यांचे सहकारी सुनील गावस्करने एक धक्कादायक अनुभव सांगितला होता. गावस्कर यांनी १९७६ मध्ये जमैका कसोटीदरम्यान गायकवाड यांच्या डोक्याला दुखापत झालेला प्रसंग शेअर केला होता. गावस्कर म्हणाले (Indian cricketer Sunil Gavaskar) की, अंशूच्या डोक्याला मार लागला होता, पण त्याने अतुलनीय धैर्य दाखवलं. आम्ही शेवटच्या कसोटीत ४०० हून अधिक धावा करत विक्रमी विजयाची नोंद केली होती. या शेवटच्या कसोटीपूर्वी मालिका १-१ अशी बरोबरीत असल्याचं देखील त्यांनी सांगितलं होतं.

सुनील गावस्कर काय म्हणाले?

गावस्कर पुढे म्हणाले की, या मालिकेपूर्वी वेस्ट इंडिजने ऑस्ट्रेलियाकडून १-५ ने मालिका गमावली होती. क्लाईव्ह लॉईड आपलं कर्णधारपद वाचवण्याच्या प्रयत्नात (Anshuman Gaekwad Death) होता. वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकली होती, अन् आम्हाला प्रथम फलंदाजी करण्यास सांगितलं होतं. पहिल्या दिवशी दुपारच्या जेवणाची वेळ झाली. आम्ही क्रीजवर होतो.

भारताचे माजी क्रिकेटपटू अंशुमन गायकवाड
Anshuman Gaekwad: 'कॅन्सर'ग्रस्त अंशुमन गायकवाड यांना मदतीचा हात! BCCIकडून १ कोटींची मदत; जय शहांनी दिले आदेश

माजी क्रिकेटपटू अंशुमन गायकवाड यांचं निधन

दुपारच्या जेवणानंतर मायकेल होल्डिंग, वेन डॅनियल आणि प्रत्येक गोलंदाजाने बाऊन्सर टाकण्यास सुरुवात केली (Anshuman Gaekwad) होती. अचानक एक बॉल गायकवाड यांच्या डोक्यात लागला. आम्हाला त्यांना ॲम्ब्युलन्समध्ये हॉस्पिटलमध्ये न्यावे लागले. अंशूने दाखवलेल्या धाडसामुळे वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यासाठी त्यांना संघात परतणं शक्य झालं होतं. गायकवाड (cricket) यांनी भारतासाठी ४० कसोटी आणि १५ एकदिवसीय सामने खेळले आहेत. ते मागील महिन्यात मायदेशी परतण्यापूर्वी लंडनमधील किंग्ज कॉलेज हॉस्पिटलमध्ये ब्लड कॅन्सरवर उपचार घेत होते.

भारताचे माजी क्रिकेटपटू अंशुमन गायकवाड
Anshuman Gaekwad Death: क्रिडाविश्वात शोककळा! माजी क्रिकेटर, प्रशिक्षक अंशुमन गायकवाड यांचे निधन, कॅन्सरशी झुंज अपयशी

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com