IND VS PAK: भारताच्या 'या' पाच चुका ठरू शकतात पराभवाचं कारण, पाकिस्तान विरुद्ध जिंकण्यासाठी काय केलं पाहिजे?

पाकिस्तान विरुद्ध सामना जिंकण्यासाठी भारतीय संघाला काय करावं लागेल?
India vs Pakistan Match
India vs Pakistan Matchsaam tv
Published On

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियात टी20 वर्ल्डकपची रणधुमाळी सुरु झाली असून भारताचा पहिला सामना पाकिस्तान विरुद्ध 23 ऑक्टोबरला मेलबर्नच्या मैदानात रंगणार आहे. पाकिस्तानच्या विरोधात यावेळी महामुकाबला होईल, असा अपेक्षा क्रिकेट विश्वात व्यक्त केली जात आहे. बाबर आझमच्या नेतृत्वात उतरणाऱ्या पाकिस्तान (India vs Pakistan) संघाविरोधात खेळताना भारताला काही चुका टाळाव्या लागणार आहेत.

भारत आणि पाकिस्तानमध्ये होणारा हा ब्लॉकबस्टर मुकाबला पाहण्यासाठी क्रिकेटप्रेमींची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मागील वर्षी झालेल्या टी-20 वर्ल्डकपमध्ये पाकिस्तान विरोधात झालेल्या सामन्यात भारताचा पराभव झाला होता. त्यामुळं यंदाच्या वर्ल्डकपमध्ये रोहित शर्माची टीम पाकिस्तानचा बदला घेण्यासाठी कंबर कसत आहे. (India vs Pakistan Match in T20 World Cup 2022 latest News Update)

India vs Pakistan Match
पाकिस्तानच्या 'त्या' धमकीनंतर मोदी सरकारच्या मंत्र्यांनी ठणकावलं, म्हणाले, भारत पॉवरहाउस...

'या' पाच चुका केल्यावर होणार मोठं नुकसान

1) खराब फिल्डिंग

टीम इंडियाची फिल्डिंग वर्ल्ड क्लास मानली जाते. परंतु, यापूर्वी पाकिस्तान विरुद्ध झालेल्या सामन्यात भारताची फिल्डिंग अपेक्षेप्रमाणे खास झाली नव्हती. आशिया कपमध्ये पाकिस्तान विरोधात झालेल्या सामन्यात अर्शदीप सिंहने झेल सोडला होता. त्यामुळे भारताला पराभवाचा सामना करावा लागला. याशिवाय अनेक मोक्याच्या वेळी भारतीय खेळाडूंची फिल्डिंग चांगली झाली नाही. पण नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात भारतीय खेळाडूंनी अप्रतिम फिल्डिंग केली. अशीच चमकदार कामगिरी भारतीय खेळाडूंना पाकिस्तान विरोधात होणाऱ्या लढतीत करायची आहे.

2) खराब सुरुवातीपासून सावध राहा

भारतीय फलंदाज पाकिस्तान विरोधात सुरुवातीच्या षटकांमध्ये धावांसाठी संघर्ष करताना दिसले आहेत. आशिया कपमध्ये ग्रुप सामन्यांमध्ये रोहित शर्मा आणि के एल राहुलने दमदार कामगिरी केली नाहीय. तसंच गतवर्षी झालेल्या वर्ल्डकपमध्येही दोन्ही खेळाडू अप्रतिम कामगिरी करताना दिसले नाहीत. आता भारतीय चाहत्यांना आशा आहे की, वर्ल्डकपमध्ये होणाऱ्या या महामुकाबल्यामध्ये हे दोन्ही खेळाडू टीमला एक चांगला विजय मिळवून देतील.

India vs Pakistan Match
T20 World Cup : वर्ल्डकप मॅचमध्ये चिमुकला जखमी, स्टेडिअममध्ये डोक्यावरच आपटला, Video व्हायरल

3) मिडल ओव्हर्समध्ये रन-रेट

आशिया कपमध्ये झालेल्या सुपर-चार सामन्यांमध्ये भारताची सुरुवात चांगली झाली होती. मात्र, मिडल ओव्हरमध्ये टीम इंडियाने विकेट्स तर गमावलेच, पण धावसंख्याही मंदावली. त्यामुळे भारत या सामन्यांमध्ये दोनशेचा आकडा गाठू शकला नाही. मागील वर्ल्डकपमध्ये पाकिस्तान विरोधात झालेल्या सामन्यातही भारताचे खेळाडू संघर्ष करताना दिसले. त्यामुळे आता टीम इंडियानं यात सुधारणा करण्याची आवश्यकता आहे.

4) 19 वे षटक

भारतीय संघासाठी 19 वा षटक खूप मोठी अडचण निर्माण करणारा ठरला आहे. मागील काही सामन्यांमध्ये भूवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह यांसारख्या गोलंदाजांना 19 व्या षटकाची जबाबदारी देण्यात आली होती. परंतु, फलंदाजांनी त्यांच्या गोलंदाजीवर आक्रमक फटकेबाजी केली. आशिया कपमध्ये पाकिस्तान विरोधात झालेल्या ग्रुप मॅचमध्ये भुवनेश्वर कुमारला १९ वं षटक देण्यात आलं होतं. या षटाकात भूवनेश्वरने 19 धावा दिल्या होत्या. त्यामुळे 23 ऑक्टोबरला होणाऱ्या पाकिस्तान विरुद्धच्या लढतीत भारताला या कमजोरीवर रामबाण उपाय शोधावा लागेल. हर्षल पटेल 19 व्या षटकासाठी जबरदस्त विकल्प होऊ शकतो. ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने अप्रतिम कामगिरी केली होती.

India vs Pakistan Match
Video: भारत-पाकिस्तान महामुकाबला कोण जिंकणार? विराट कोहली, बाबर आझम आणि रिझवानचा 'तो' व्हिडिओ व्हायरल

5) रिझवान-बाबरला लवकर बाद करणं

पाकिस्तानचा विकेटकीपर आणि आक्रमक फलंदाज मोहम्मद रिझवान आणि बाबर आझम भारतीय संघाविरोधात चमकदार कामगिरी करतात. मागील वर्ल्डकपमध्ये झालेल्या टीम इंडिया विरुद्धच्या सामन्यात या दोघांनी मिळून पाकिस्तानला विजय संपादन करून दिलं होतं. आशिया कपमध्ये बाबर फॉर्ममध्ये दिसला नाही, पण रिझवानने दोन्ही सामन्यांत कमाल केली होती. भारताला जर आगामी होणाऱ्या सामन्यात विजय मिळवायचा असेल, तर बाबर आणि रिझवानला सुरुवातीच्या षटकांमध्येच पव्हेलियनचा रस्ता दाखवावा लागेल. यासाठी भारताच्या वेगवान गोलंदाजांना सटीक लाईन-लेंथवर गोलंदाजी करावी लागेल. जेणेकरून दोन्ही फलंदाजांवर दबाव येईल आणि ते विकेट गमावतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com