Intercontinental Cup: भारतीय संघाने इंटरकॉन्टिनेंटल स्पर्धेत आतापर्यंत दमदार कामगिरी केली आहे. सोमवारी (१२ जुन) नुआतु संघाला पराभुत करत भारतीय संघाने या स्पर्धेतील सलग दुसरा विजय मिळवला आहे.
भुवनेश्वरमधील कलिंगा स्टेडिअममध्ये पार पडलेल्या या सामन्यात भारतीय फुटबॉल संघाने १-० ने विजय मिळवला.
या सामन्यातील ८१ व्या मिनिटाला भारतीय कर्णधार सुनील छेत्रीने गोल केला. हा गोल केल्यानंतर सुनिल छेत्रीने हटके सेलिब्रेशन करत एक आनंदाची बातमी दिली आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
आतंरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सक्रिय असलेल्या खेळाडूंमध्ये सुनील छेत्री हा सर्वाधिक गोल्स करणारा तिसरा खेळाडू आहे. नुकता-च त्याने आपल्या फॅन्सला आनंदाची बातमी दिली आहे. गोल केल्यानंतर त्याने फुटबॉल आपल्या टी शर्टमध्ये ठेवला अन् आपल्या गर्भवती पत्नीला हा गोल समर्पित केला.
यावेळी त्याची पत्नी सोनम हा सामना पाहण्यासाठी उपस्थित होती. सुनिल छेत्रीने सेलिब्रेशन करताच ती त्याचा उत्साह वाढवताना दिसुन आली होती. बरेच वर्ष रिलेशनशिपमध्ये राहील्यानंतर दोघेही २०१७ मध्ये विवाह बंधनात अडकले होते.
हा सामना झाल्यानंतर त्याने आपल्या सेलिब्रेशनबद्दल माहिती दिली आहे. त्याने म्हटले आहे की, 'माझी पत्नी गर्भवती आहे. तिची अशी इच्छा होती की मी ही आनंदाची बातमी सर्वांसोबत शेअर करावी. आम्हाला सर्वांच्या शुभेच्छा हव्या आहेत.' (Latest sports updates)
शुक्रवारी झालेल्या सामन्यात भारत आणि मंगोलिया हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात भारतीय संघाने २-० ने विजय मिळवला होता. भारतीय संघाने २ गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे.
गुरूवारी भारतीय संघाचा राऊंड रॉबिन फेरीतील अंतिम सामना पार पडणार आहे. जागतिक क्रमवारीत १०१ व्या स्थानी असलेल्या भारतीय संघाने या दोन्ही सामन्यांमध्ये दमदार कामगिरी केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.