Rohit Sharma Record: हिटमॅनचा नाद करायचा नाय! शून्यावर बाद होऊनही पूर्ण केलं अनोखं शतक;ठरलाय जगातील पहिलाच खेळाडू

India vs Afghanistan 1st T20I: या सामन्यातील दुसऱ्याच चेंडूवर कर्णधार रोहित शर्मा शून्यावर रनआऊट होऊन माघारी परतला. दरम्यान शून्यावर बाद होऊनही रोहितने हटके शतक पूर्ण केलं आहे.
ROHIT SHARMA
ROHIT SHARMAsaam tv news

Rohit Sharma Record News In Marathi:

भारत आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांमध्ये ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेतील पहिला टी-२० सामना गुरुवारी पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने अफगाणिस्तानला धूळ चारत ६ गडी राखून विजय मिळवला आहे.

टी-२० वर्ल्डकप २०२२ स्पर्धेनंतर रोहित शर्मा आपला पहिलाच सामना खेळण्यासाठी मैदानावर उतरला होता. या सामन्यातील दुसऱ्याच चेंडूवर कर्णधार रोहित शर्मा शून्यावर रनआऊट होऊन माघारी परतला. दरम्यान शून्यावर बाद होऊनही रोहितने हटके शतक पूर्ण केलं आहे.

रोहित शर्मा हा टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळेस विजयी संघाचा भाग असलेल्या संघाचा खेळाडू ठरला आहे. रोहित शर्माने भारतीय संघासाठी १४९ टी-२० सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने १०० वेळेस विजय मिळवलेल्या संघाचे प्रतिनिधित्व केलं आहे.

या यादीत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग अव्वल स्थानी आहे. रिकी पाँटींगने कसोटी क्रिकेटमध्ये १०८ वेळेस विजयी झालेल्या संघाचे प्रतिनिधित्व केलं आहे. यासह वनडे क्रिकेटमध्ये त्याने २६२ वेळेस विजयी झालेल्या संघाचे प्रतिनिधित्व केलं आहे. (Latest sports updates)

तिन्ही फॉरमॅटमध्ये सर्वाधिक वेळेस विजयाचा भाग असलेले खेळाडू..

कसोटी क्रिकेट -रिकी पाँटिंग (१०८ कसोटी सामने)

वनडे क्रिकेट - रिकी पाँटिंग (२६२ वनडे सामने)

टी-२० क्रिकेट - रोहित शर्मा (१०० टी-२० सामने )

ROHIT SHARMA
IND vs AFG: शिवम सुंदरम् ... ! दुबेच्या अष्टपैलू खेळीनं टीम इंडियानं अफगाणिस्तानला केलं चारीमुंड्या चीत

शून्यावर झाला रनआऊट..

मोहालीच्या मैदानावर झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अफगाणिस्तान संघाने प्रथम फलंदाजी करताना १५८ धावा केल्या.

ROHIT SHARMA
Rohit Sharma Runout: रोहित स्वतःच्या चुकीमुळेच आऊट झाला? नेमकं काय घडलं? पाहा Video

भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी १५९ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करण्यासाठी रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांची जोडी मैदानावर आली. मात्र दुसऱ्याच चेंडूवर दोघांचा ताळमेळ बिघडला. त्यामुळे रोहितला रनआऊट होऊन माघारी परतावं लागलं. मात्र शिवब दुबेच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर भारतीय संघाने या सामन्यात एकतर्फी विजय मिळवला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com