टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेचा थरार येत्या २ जूनपासून रंगणार आहे. तर भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ ९ जून रोजी आमने सामने येणार आहे. या सामन्यासाठी नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय स्टेडियम सज्ज झालं आहे. भारतीय संघातील फलंदाज आणि पाकिस्तानचे गोलंदाज असा हा सामना असणार आहे . भारतीय संघात एक असा फलंदाज आहे, जो पाकिस्तानच्या गोलंदाजांची पळता भुई थोडी करू शकतो. कोण आहे तो खेळाडू जाणून घ्या.
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. हा त्याचा शेवटचा टी -२० वर्ल्डकप असू शकतो. त्यामुळे ही स्पर्धा जिंकण्यासाठी आणखी जास्त जोर लावताना दिसून येऊ शकतो. जेव्हा रोहित फॉर्ममध्ये असतो तेव्हा तो कुठलंही गोलंदाजी आक्रमण फोडून काढू शकतो. तसेच संघाचं नेतृत्व करताना तो ज्याप्रकारे क्षेत्ररक्षण सजवतो,त्यामुळे देखील समोरचा संघ प्रेशरमध्ये येतो.
सलामीला येणारा रोहित नेहमीच आपल्या संघाला आक्रमक सुरुवात करून देण्याच्या प्रयत्नात असतो. यापूर्वी वनडे वर्ल्डकप २०२३ स्पद्धेतही त्याने संघाला जोरदार सुरुवात करून दिली होती. त्यामुळे पाकिस्तानच्या गोलंदाजांना रोहित शर्माकडून सावध राहावं लागेल. रोहितचा टी -२० क्रिकेटमधील रेकॉर्ड पाहिला तर, त्याने १५१ टी -२० सामन्यांमध्ये ३१.२९ च्या सरासरीने ३९७४ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने ५ शतक आणि २९ अर्धशतक झळकावले आहेत.
रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, यशस्वी जयस्वाल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शिवम दुबे, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल
शुभमन गिल, रिंकू सि्ंग, खलील अहमद, आवेश खान
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.