Ind Vs WI, Rohit Sharma Update: ५ चेंडूच खेळला अन् रिटायर्ड हर्ट झाला रोहित शर्मा; आता आली मोठी अपडेट

वेस्ट इंडीजविरुद्धच्या तिसऱ्या टी २० सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्मा फलंदाजी करत असतानाच जायबंदी झाला आणि त्याला मैदानाबाहेर जावे लागले.
India Vs West Indies 3rd T 20 Rohit Sharma on Injury
India Vs West Indies 3rd T 20 Rohit Sharma on InjurySAAM TV
Published On

मुंबई: भारत आणि वेस्ट इंडीज (Ind Vs WI) यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेच्या तिसऱ्या सामन्यात भारतानं अगदी सहज विजय मिळवला. मात्र, भारतासाठी चिंतेची बाब म्हणजे कर्णधार रोहित शर्मा हा या सामन्यावेळी जायबंदी झाला. फक्त ५ चेंडू खेळून तो मैदानाबाहेर गेला. त्याच्या पाठीच्या मांसपेशी ताणल्या गेल्याने त्याला मैदानाबाहेर जावे लागले. या सामन्यानंतर रोहित शर्माबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. (Rohit Sharma Injury Update News)

India Vs West Indies 3rd T 20 Rohit Sharma on Injury
PV Sindhu : आनंदित आहाेत पण..., राैप्य पदक पटकाविल्यानंतर पीव्ही सिंधूची पहिली प्रतिक्रिया

रोहित शर्मा म्हणाला की, मी ठीक आहे. आमच्या पुढच्या सामन्याला बराच अवधी आहे. तोपर्यंत मी पूर्णपणे फिट होईल अशी आशा आहे.

भारत आणि वेस्ट इंडीज (India Vs West Indies) यांच्यात मंगळवारी लढत झाली. यात भारताने विजय मिळवला. रोहित शर्माने सलामीला येत चांगली सुरुवातही केली. ५ चेंडूंवर त्याने ११ धावा केल्या. या छोट्याशा डावात त्याने एक चौकार आणि एक षटकार लगावला होता.

India Vs West Indies 3rd T 20 Rohit Sharma on Injury
Asia Cup 2022 Schedule: भारत-पाकिस्तानमध्ये रंगणार सामना, आशिया कपचे वेळापत्रक जाहीर

वेस्ट इंडीजविरुद्ध भारतीय संघाने (Team India) विजय मिळवला. या सामन्यात भारतीय संघासमोर वेस्ट इंडीजनं १६५ धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. सूर्यकुमार यादवने ४४ चेंडूंत ७६ धावांची तुफानी खेळी केली. त्या जोरावर भारतीय संघाने ७ विकेटने हा सामना जिंकला.

या सामन्यानंतर रोहित शर्मा (Rohit Sharma) म्हणाला की, आम्ही लक्ष्याचा पाठलाग अगदी सहज केला. आपल्या फलंदाजांनी कोणतीही जोखीम न घेता हा सामना सहज जिंकला. सूर्यकुमारने श्रेयस अय्यरसोबत चांगली भागीदारी रचली. जेव्हा तुम्ही अशा प्रकारच्या लक्ष्याचा पाठलाग करता त्यावेळी काहीही होऊ शकलं असतं. पीचमुळे गोलंदाजांना चांगली मदत मिळत होती. अशावेळी हे आव्हान सोपे नव्हते.

टीम इंडियाची २-१ ने आघाडी

भारतीय संघाने ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेत २-१ ने आघाडी घेतली आहे. टीम इंडियाने या मालिकेचा पहिला सामना एकतर्फी जिंकला होता. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात पराभव पत्करावा लागला होता. आता तिसरा सामना जिंकून टीम इंडियाने या मालिकेत आघाडी घेतली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com