IND vs WI : तिसऱ्या एकदिवसीय सामन्यांत टीम इंडियात होणार बदल; या खेळाडूंना मिळणार संधी?

मालिका 3-0 ने जिंकण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न
IND vs WI 3rd ODI indian Team
IND vs WI 3rd ODI indian TeamSaam TV
Published On

नवी दिल्ली : भारत आणि वेस्ट इंडिज (India Vs West Indies) संघात सध्या एकदिवसीय मालिका सुरू आहे. तीन सामन्याच्या या मालिकेत भारतीय (Team India) संघाने सुरूवातीचे दोन सामने जिंकत विजयी आघाडी घेतली आहे. मालिकेतील तिसरा आणि अखेरचा एकदिवसीय सामना बुधवारी त्रिनिदाद येथील क्वीन्स पार्क ओव्हल मैदानावर खेळवला जाईल. या सामन्यांत भारतीय संघाच्या प्लेईंग - 11 मध्ये काही बदल होण्याची शक्यता आहे. (IND vs WI 3rd ODI indian Team Playing -11)

IND vs WI 3rd ODI indian Team
राष्ट्रकुल स्पर्धेआधीच नवा वाद! 'माझ्या प्रशिक्षकांना थेट घरी पाठवले' बॉक्सर लव्हलिनाचा गंभीर आरोप

मालिका 3-0 ने जिंकण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न

तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातही भारतीय संघ विजयाच्या इराद्याने मैदानात उतरेल. हा सामना जिंकून मालिका 3-0 ने आपल्या खिशात घालण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असणार आहे. दुसरीकडे, अंतिम सामन्यांत कॅरेबियन संघाची प्रतिष्ठा पणाला असेल. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत या सामन्यांत विजय मिळवणे हाच त्यांचा प्रयत्न असेल.

या औपचारिक सामन्यात दोन्ही संघांचे कर्णधार नाणेफेकसाठी संध्याकाळी 6.30 वाजता मैदानात उतरतील. त्याच वेळी, सामन्याचा खरा थरार अर्ध्या तासानंतर म्हणजे संध्याकाळी 7.00 वाजता सुरू होईल. अशा परिस्थितीत भारताचा कर्णधार शिखर धवन विरोधी संघाविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात संघामध्ये काही बदल करू शकतो. (IND vs WI 3rd ODI Latest News)

IND vs WI 3rd ODI indian Team
IND vs WI : धोनीसारखाच षटकार ठोकत अक्षरनं सामना जिंकवला; भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय

सलामीची जोडी सुपरहिट

शिखर धवन आणि शुभमन गिल ही जोडी वेस्ट इंडिज दौऱ्यावर भारतीय संघासाठी वनडे फॉरमॅटमध्ये हिट ठरली आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यात धवनने ९७ धावांचे सर्वोत्तम अर्धशतक झळकावले. त्याचवेळी गिलने पहिल्या एकदिवसीय सामन्यात 64 धावा आणि दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 43 धावा केल्या. इतकेच नाही तर पहिल्या वनडे सामन्यात या दोन खेळाडूंमध्ये शतकी भागीदारीही झाली होती. अशावेळी शुभमन गिलसोबत सलामीला येणाच्या धवनचा प्रयत्न असेल.

मधल्या फळीची जबाबदारी सुर्यकुमार, श्रेयसवर

दुसरीकडे मधल्या फळीची जबाबदारी जबरदस्त फॉर्मात असलेल्या श्रेयस अय्यरसह सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन आणि दीपक हुडा यांच्या खांद्यावर असेल. कोहलीच्या अनुपस्थितीत अय्यरने तिसर्‍या क्रमांकाची कमतरता भरून काढली आहे. याशिवाय तिसर्‍या एकदिवसीय सामन्यात यादवकडूनही चाहत्यांना फलंदाजीची अपेक्षा असेल. संजू सॅमसनने गेल्या सामन्यात अर्धशतक झळकावून फॉर्ममध्ये परतण्याचा संदेश दिला आहे. दुसरीकडे हुडाने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात आपल्या अष्टपैलू कामगिरीने सर्वांची मने जिंकली आहेत.

IND vs WI 3rd ODI indian Team
Axar Patel : अक्षर पटेलची धमाकेदार इनिंग; महेंद्रसिंग धोनीचा १७ वर्षे जुना रेकॉर्ड मोडला (व्हिडिओ बघा)

या अष्टपैलू खेळाडूंना मिळू शकते संधी

तिसर्‍या एकदिवसीय सामन्यात अष्टपैलू खेळाडू म्हणून पुन्हा एकदा शार्दुल ठाकूर आणि अक्षर पटेल ही जोडी मैदानात पाहायला मिळेल. या दोन्ही खेळाडूंनी आपल्या अष्टपैलू कामगिरीने सर्वांची मने जिंकली आहेत. विशेषत: अक्षर पटेलने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाला अडचणीतून बाहेर काढत सामना जिंकून दिला होता. अक्षरला या सामन्यांतही संधी देण्याचा धवनचा प्रयत्न असेल.

गोलंदाजीत होऊ शकतात बदल

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात संघ व्यवस्थापनाने प्रसिद्ध कृष्णाच्या जागी आयपीएल स्टार आवेश खानला संघात घेतलं होतं. मात्र, आवेशला या सामन्यांत फारशी चमक दाखवता आली नाही. अशा स्थितीत अर्शदीप सिंगला तिसऱ्या वनडेत पदार्पणाची संधी मिळू शकते. याशिवाय दुसरा वेगवान गोलंदाज म्हणून मोहम्मद सिराजचे खेळणे जवळपास निश्चित आहे. दुसरीकडे संघ व्यवस्थापन अनुभवी फिरकी गोलंदाज युझवेंद्र चहलच्या जागी युवा फिरकीपटू रवी बिश्नोईला संधी देऊ शकते.

अशी असू शकते प्लेइंग इलेव्हन

शुभमन गिल, शिखर धवन (कर्णधार), श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन (विकेटकीपर), दीपक हुडा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग आणि रवी बिश्नोई.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com