IND vs SL : हार्दिक पांड्याकडे टी-२० संघाची सूत्रे; सूर्यकुमारलाही मिळाली मोठी जबाबदारी, रोहित शर्माचा पत्ता कट?

भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-२० मालिकेला येत्या ३ जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.
India vs  Srilanka T-20 Series
India vs Srilanka T-20 SeriesSaam Tv
Published On

India vs Sri Lanka T-20 Series : भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-२० मालिकेला येत्या ३ जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची (Indian Team) घोषणा करण्यात आली आहे. अष्टपैलू हार्दिक पांड्याकडे कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली असून रोहित शर्माला टी-२० मालिकेतून वगळण्यात आलं आहे. त्यामुळे आता रोहित शर्मा भारताचा टी-२० कर्णधार राहणार नाही हे स्पष्ट झाले आहे.

India vs  Srilanka T-20 Series
Virat Kohli: विराट कोहलीचा टी-20 फॉरमॅटबाबत मोठा निर्णय, BCCIच्या वरिष्ठ अधिकाऱ्याची माहिती; चाहत्यांना मोठा धक्का

बीसीसीआयने आगामी श्रीलंका (Srilanka) टी-२० मालिकेसाठी मंगळवारी १६ सदस्यीय संघाची घोषणा केली. सूर्यकुमार यादवला त्याच्या चांगल्या कामगिरीचे बक्षीस मिळाले असून त्याला उपकर्णधार बनवण्यात आले आहे. त्याचबरोबर शिवम मावी आणि मुकेश कुमार हेही वेगवान गोलंदाज म्हणून संघात स्थान मिळवण्यात यशस्वी ठरले आहेत.

याआधी पांड्याला न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी टी-२० संघाची कमान मिळाली होती. त्याने दमदार कामगिरी करत भारतीय संघाला विजय मिळवून दिला होता. आता श्रीलंकेविरोधातील मालिकेतही पांड्याकडे कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे.  (Latest Marathi News)

गेल्या काही दिवसांपासून हार्दिक पांड्या हा टीम इंडियाचा नवा टी -२० कर्णधार बनणार अशी चर्चा सुरू होत्या. दरम्यान, रोहिकडून सध्यातरी टी-२० संघाचे कर्णधारपद काढून घेतलं असलं, तरी त्याच्याकडे वनडे कर्णधारपदाची कमान कायम आहे. दुसरीकडे पांड्याला टी-२० चे नियमित कर्णधारपद देण्यात आले आहे की नाही, याची माहिती बीसीसीआयकडून देण्यात आलेली नाही.

श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ

हार्दिक पंड्या (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), रुतुराज गायकवाड, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्श पटेल सिंग, हर्षल पटेल, उमरान मलिक, शिवम मावी, मुकेश कुमार.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com