Virat Kohli: विराट कोहलीचा टी-20 फॉरमॅटबाबत मोठा निर्णय, BCCIच्या वरिष्ठ अधिकाऱ्याची माहिती; चाहत्यांना मोठा धक्का

विराट कोहलीने T२० आंतरराष्ट्रीय मधून ब्रेक घेण्याच्या निर्णयानंतर श्रीलंकेविरुद्धच्या आगामी तीन सामन्यांच्या T२० मालिकेत तो दिसणार नाही.
Virat Kohli
Virat Kohli saam Tv
Published On

मुंबई : नवीन वर्षात भारत आणि श्रीलंका  (Srilanka)  यांच्यात टी-२० मालिका पार पडणार आहे. येत्या ३ जानेवारीपासून या टी-२० मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेत अनेक मोठे प्लेअर्स खेळणार नाही, असं बोललं आहे. आता याबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे.

भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तात्पुरती विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तो आयपीएल २०२३ मध्ये खेळताना दिसणार नाही, असं देखील बोललं जात आहे.

Virat Kohli
BCCI: नव्या निवड समितीची नियुक्तीच नाही; श्रीलंकेविरुद्ध मालिकेसाठी संघ निवड कोण करणार? दुखापतीमुळे रोहित संघाबाहेर?

विराट कोहलीच्या ब्रेकबद्दल माहिती देताना, बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने इनसाइडस्पोर्ट्सला सांगितले की, विराट कोहलीने बीसीसीआयला कळवले आहे की तो T20 मालिकेसाठी उपलब्ध नाही. वनडे मालिकेतून तो संघात पुनरागमन करेल.

मात्र, तो टी-२० इंटरनॅशनलमधूनही ब्रेक घेत आहे की नाही याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. दुसरीकडे रोहित शर्माच्या पुनरागमनाची आम्हाला घाई करायची नाही. तो पूर्णपणे तंदुरुस्त आहे की नाही हे येत्या काळात ठरवले जाईल. त्याने फलंदाजीचा सराव सुरू केला आहे, पण आम्हाला कोणताही धोका पत्करायचा नाही, असं देखील वरीष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केलं.

Virat Kohli
Cricket News: श्रीलंकेविरुद्ध T20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा होताच 'या' खेळाडूला बसणार धक्का; संघातून होणार पत्ता कट

विराट कोहलीने T२० आंतरराष्ट्रीय मधून ब्रेक घेण्याच्या निर्णयानंतर श्रीलंकेविरुद्धच्या आगामी तीन सामन्यांच्या T२० मालिकेत तो दिसणार नाही. भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-२० मालिका येत्या ३ जानेवारीपासून सुरू होत आहे. याआधी सर्वांना वाटत होते की विराट या मालिकेत असेल. पण विराटने टी-२० मधून ब्रेक घेण्याचा निर्णय घेऊन सर्वांना धक्का दिला आहे.

भारत आणि श्रीलंका मालिकेचे वेळापत्रक

श्रीलंकेचा संघ आपल्या भारत दौऱ्याची सुरुवात T20 मालिकेने ३ जानेवारीला होईल. दुसरा सामना ५ जानेवारीला पुण्यात तर तिसरा आणि अंतिम सामना ७ जानेवारीला राजकोटमध्ये खेळवला जाईल. त्यानंतर दोन्ही संघांमध्ये 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका देखील खेळवली जाईल. ज्यांचा पहिला सामना १० जानेवारीला गुवाहाटी, १२ जानेवारीला कोलकाता, तर तिसरा आणि अंतिम वनडे १५ जानेवारीला तिरुअनंतपुरममध्ये खेळवला जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com