आशिया चषकातील अंतिम सामना भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. भारताचा संघ पाकिस्तान आणि श्रीलंकेवर विजय मिळवत अंतिम फेरीत दाखल झाला आहे. तर श्रीलंकेने पाकिस्तान आणि बांगलादेशला धूळ चारत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
हा सामना कोलंबोतील प्रेमदासा स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. दरम्यान या सामन्यापूर्वी जाणून घ्या कसा राहिलाय दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड.
भारत आणि श्रीलंका हे दोन्ही संघ आतंरराष्ट्रीय क्रिकेटमधील बलाढ्य संघ आहेत. हे दोन्ही संघ आतापर्यंत १६६ वनडे सामन्यांमध्ये आमने सामने आले आहेत. यादरम्यान भारतीय संघाने ९७ सामन्यांमध्ये बाजी मारली आहे.
तर श्रीलंकेला केवळ ५७ सामन्यांमध्ये विजय मिळवता आला आहे. एक सामना बरोबरीत समाप्त झाला आहे. आकडेवारी पाहिली तर भारतीय संघाचं पारडं जड आहे.
आशिया चषक २०२३ स्पर्धेत अशी राहिलीये दोन्ही संघांची कामगिरी..
आशिया चषकाच्या सुपर ४ फेरीत दोन्ही संघांनी १-१ सामना गमावला आहे. भारतीय संघाने पाकिस्तान आणि श्रीलंकेला पराभूत करत अंतिम फेरीचं तिकीट मिळवलं तर श्रीलंकेने पाकिस्तान आणि बांगलादेशला पराभूत करत अंतिम फेरी गाठली आहे.
साखळी फेरीतील सामन्यांमध्ये भारतीय संघाने पाकिस्तान आणि नेपाळचा धुव्वा उडवला होता. तर श्रीलंकेने बांगलादेश आणि अफगाणिस्थानवर विजय मिळवला होता. आता अंतिम सामन्यात कोण बाजी मारणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. (Latest sports updates)
या सामन्यासाठी असे आहेत दोन्ही संघ:
भारतीय संघ :
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (यष्टिरक्षक), शुबमन गिल, विराट कोहली, ईशान किशन, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, वॉशिंग्टन सुंदर, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, प्रसिद्ध कृष्णा आणि तिलक वर्मा.
आशिया चषकासाठी असा आहे श्रीलंकेचा संघ :
दासुन शनाका (कर्णधार), कुसल मेंडिस (यष्टिरक्षक), पथुम निसांका, कुसल परेरा, सदीरा समरविक्रमा, चरिथ असालंका, धनंजय डी सिल्वा, दुनिथ वेलालागे, प्रमोद मदुशन, मथीशा पथिराना, साहन अराचचेगे, दुशान हेमंथा, कासुन रजिता, बिनुरा फर्नांडो, दिमुथ करुणारत्ने.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.