IND vs SL, T20I Series: टीम इंडियाची ताकद आणखी वाढणार! श्रीलंकेला आव्हान देण्यासाठी स्टार खेळाडूचं संघात कमबॅक

India's tour of Sri Lanka 2024: भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये ३ टी-२० सामन्यांची मालिका रंगणार आहे.
IND vs SL: टीम इंडियाची ताकद आणखी वाढणार! श्रीलंकेला आव्हान देण्यासाठी स्टार खेळाडूचं संघात कमबॅक
Team IndiaTwitter
Published On

भारत आणि श्रीलंका यांच्यात होणाऱ्या टी-२० मालिकेसाठी दोन्ही संघ सज्ज आहेत. दोन्ही संघांनी मालिकेच्या दृष्टीने सराव करायला सुरुवात केली आहे. या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे आणि ३ टी-२० सामन्यांची मालिका रंगणार आहे. या मालिकेतील पहिला सामना २७ जुलै रोजी रंगणार आहे. ही मालिका अतिशय खास असणार आहे. कारण गौतम गंभीरची ही मुख्य प्रशिक्षक म्हणून पहिलीच मालिका असणार आहे. यासह सूर्यकुमार यादव पहिल्यादांच पूर्णवेळ कर्णधार म्हणून मैदानात उतरणार आहे.

IND vs SL: टीम इंडियाची ताकद आणखी वाढणार! श्रीलंकेला आव्हान देण्यासाठी स्टार खेळाडूचं संघात कमबॅक
Sri Lanka Squad, IND vs SL: टीम इंडियाला आव्हान देण्यासाठी श्रीलंकेचा संघ जाहीर! या खेळाडूकडे नेतृत्वाची धुरा

आयसीसी टी-२० वर्ल्डकप झाल्यानंतर रोहित शर्मा,विराट कोहली आणि रविंद्र जडेजाने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या मालिकेसाठी युवा खेळाडूंना संघात स्थान देण्यात आलं आहे. ज्यात यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, रिंकू सिंगसारख्या स्टार खेळाडूंचा समावेश आहे. यापूर्वी रोहित सलामीला फलंदाजीला यायचा. मात्र या मालिकेत शुभमन गिल आणि यशस्वी जयस्वाल डावाची सुरुवात करण्यासाठी मैदानात येऊ शकतो.

IND vs SL: टीम इंडियाची ताकद आणखी वाढणार! श्रीलंकेला आव्हान देण्यासाठी स्टार खेळाडूचं संघात कमबॅक
Team India News: या 5 खेळाडूंची वनडे कारकिर्द जवळजवळ संपली! निवृत्तीशिवाय पर्याय नाही

हा स्टार खेळाडू करणार कमबॅक

हार्दिक पंड्याने आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेत शानदार कामगिरी केली होती. ज्यावेळी संघाला गरज होती, त्यावेळी त्याने धावा केल्या आणि विकेट्सही काढून दिल्या. या स्पर्धेत त्याच्याकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवली गेली होती. त्यामुळे असं म्हटलं जात होतं की, रोहितनंतर हार्दिक पंड्या संघाचा कर्णधार होऊ शकतो. मात्र गौतम गंभीर आणि मुख्य निवडकर्ते अजित आगरकरने कर्णधारपदाची जबाबदारी सूर्यकुमार यादवकडे सोपवली.

IND vs SL: टीम इंडियाची ताकद आणखी वाढणार! श्रीलंकेला आव्हान देण्यासाठी स्टार खेळाडूचं संघात कमबॅक
Team India Captain: ना हार्दिक,ना सूर्या; शुभमन गिल होणार भविष्यातील कर्णधार! ही आहेत प्रमुख कारणं

टी-२० वर्ल्डकप झाल्यानंतर भारतीय संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर गेला होता. या दौऱ्यावर हार्दिकला विश्रांती दिली गेली होती. आता श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या मालिकेतून तो कमबॅक करताना दिसून येणार आहे. हार्दिक पंड्या हा आपल्या भेदक गोलंदाजीसाठी आणि आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. रोहितच्या अनुपस्थितीत हार्दिकची भूमिका अतिशय महत्वाची असणार आहे. कारण हार्दिकला नेतृत्वाचा दांडगा अनुभव आहे. त्यामुळे तो नेतृत्वाच्या बाबतीत सूर्यकुमार यादवला मदत करु शकतो.

श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या टी-२० मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ:

सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, रिंकू सिंग, रियान पराग, रिषभ पंत, संजू सॅमसन, हार्दिक पंड्या, शिवम दुबे,अर्शदीप सिंग, खलील अहमद आणि मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, रवि बिश्नोई.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com