Ind vs SA 2nd Test: भारतविरुद्ध दक्षिण अफ्रिकेच्या दुसऱ्या कसोटीच्या वेळेत बदल, कधी सुरु होणार सामना? का होणार बदल जाणून घ्या

India vs South Africa 2nd Test Timing: बीसीसीआयने गुवाहाटी येथे होणाऱ्या भारतविरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसऱ्या कसोटी सामन्याच्या वेळेत बदल केला आहे. सामन्याच्या वेळात बदल का केला जाणार याची कारणे तपासा.
India vs South Africa 2nd Test Timing:
BCCI updates timing for the India vs South Africa 2nd Test in Guwahati — new schedule announced.saam tv
Published On
Summary
  • दुसऱ्या कसोटीच्या वेळेत बीसीसीआयने बदल केला

  • हवामान आणि प्रसारणाच्या कारणास्तव वेळ बदल करण्यात आलाय.

  • पहिला कसोटी सामना १४ नोव्हेंबर रोजी कोलकात्यात होणार आहे.

भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. यामधील पहिला कसोटी सामना १४ नोव्हेंबर रोजी होईल. पहिला सामना कोलकातामधील ईडन गार्डन्स मैदानावर होईल. तर दुसरा कसोटी सामना २२ नोव्हेंबरपासून गुवाहाटी येथे खेळवला जाईल. परंतु दोन्ही सामन्यामधील वेळांमध्ये बदल असणार आहे.

India vs South Africa 2nd Test Timing:
Ind vs Aus: वॉशिंग्टन अति'सुंदर'! टीम इंडियाकडून ऑस्ट्रेलियाचा करेक्ट कार्यक्रम; सिरीजमध्ये भारत आघाडीवर

पहिला कसोटी सामन्याला भारतीय वेळेनूसार सकाळी साडेनऊ वाजता सुरुवात होईल. परंतु दुसरा कसोटी सामना सकाळी ९ वाजतापासून खेळवला जाईल. त्यामागे काय कारण आहे, ते जाणून घेऊ. कसोटी सामने हे दिवसभरात तीन सत्रात होत असतात. भारतात कसोटी सामने साधारणपणे सकाळी साडेनऊ वाजता सुरू होतात. पहिले सत्र दोन तासांचे असते. त्यानंतर ४० मिनिटांचा लंच ब्रेक आणि दुसरे सत्र दोन तासांचे असते. तिसरे सत्र २० मिनिटांच्या चहापानानंतर सुरू होत असते.

India vs South Africa 2nd Test Timing:
Rohit Sharma: वनडे क्रिकेटबाबत BCCIची रोहित शर्माला ताकीद; वॉर्निगनंतर 'हिट-मॅन'चा मोठा निर्णय

दुसऱ्या कसोटीत वेळ का बदलण्यात येणार?

मात्र दुसऱ्या दुसऱ्या कसोटीत असे होणार नाही. भारताचा एकच वेळ क्षेत्र आहे. तर गुवाहाटी देशाच्या ईशान्य भागात आहे. यामुळे येथे सूर्य लवकर उगवतो आणि लवकर मावळतो. सध्या सूर्य सकाळी साडेपाच वाजता उगवतो आणि संध्याकाळी साडेचार वाजता मावळतो. म्हणूनच भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना सकाळी ९ वाजता खेळण्यास सुरुवात होईल. तर नाणेफेक सकाळी साडेआठ वाजता होईल.

दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात सकाळी ११ वाजता चहापानाचा ब्रेक होईल. त्यानंतर २० मिनिटांनी खेळ पुन्हा सुरू होईल. मग दुपारी १.२० वाजता लंच ब्रेक होईल. हा ब्रेक ४० मिनिटाचा असेल. त्यानंतर दुपारी २ वाजता खेळ पुन्हा सुरू होईल आणि ४ वाजेपर्यंत चालेल. जर नियोजित षटके पूर्ण झाली नाहीत तर दिवसाचा खेळ अर्धा तास वाढवता येऊ शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com