India vs South Africa: तिलक वर्मानं मारला लांबलचक षटकार, विजेच्या गतीनं मारलेला फटका पाहून डोळे गरगरतील |Video

Tilak Varma : भारताने दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 गडी गमवून 175 धावा केल्या आणि विजयासाठी 176 धावांचं आव्हान दिलं. या सामन्यात तिलक वर्माने मारलेला षटकार चर्चेचा विषय ठरला. त्याला कारणही तसंच आहे.
Tilak Varma
Tilak Varma after smashing a breathtaking long six during the India vs South Africa 1st T20
Published On
Summary
  • भारताने प्रथम फलंदाजी करत २० षटकात १७५ धावा केल्या.

  • हार्दिक पांड्याचे ५९ धावांचे झंझावाती अर्धशतक.

  • तिलक वर्माचा लांबचा आणि वेगवान षटकार व्हायरल.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना आज कटकमधील बाराबती स्टेडियमवर खेळला गेला. दोन महिन्यांनी सुरू होणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या तयारीसाठी ही टी-२० मालिका महत्त्वाची मानली जातोय. पहिल्या टी20 सामन्यात भारताने नाणेफेकीचा कौल गमावला.

Tilak Varma
India vs South Africa 1st T20: दक्षिण आफ्रिकेचा लाजिरवाणा पराभव; टीम इंडियाचा १०१ धावांनी शानदार विजय

मात्र दक्षिण आफ्रिकेनं टीम इंडियाला प्रथम फलंदाजी करण्याचे निमंत्रण दिलं. या सामन्यात भारताने २० षटकात ६ गडी गमावले आणि १७५ धावा केल्या. भारताकडून हार्दिक पांड्याने सर्वोत्तम खेळी करत. त्याने २८ चेंडूत ६ चौकार आणि ४ षटकार मारत नाबाद ५९ धावा केल्या. त्यानंतर तिलक वर्माने २६ धावांची खेळी केली.

Tilak Varma
T20 World Cup 2026: भारतात दिसणार नाहीत विश्वचषकाचे सामने? चाहत्यांमध्ये खळबळ, काय आहे कारण?

त्याने ३२ चेंडूंचा सामना केला. २ चौकार आणि एका षटकारांच्या मदतीने २६ धावा केल्या. यात त्याने एकमेक षटकार मारला. पण त्या षटकाराची चर्चा रंगलीय. सोशल मीडियावर त्याने मारलेला षटकाराचा व्हिडिओ व्हायरल होतोय. वर्माने मारलेला हा फटका थेट स्टेडियमच्या बाहेर गेला.

भारताचे तीन विकेट झटपट बाद झाल्यानंतर तिलक वर्मा सावध खेळी करत होता. त्याने २४ चेंडूत १६ धावा केल्या होत्या. दक्षिण अफ्रिकेकडून १० वं षटक टाकण्यासाठी एनरिक नोर्त्जे आला होता. त्याच्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर तिलक वर्माने उत्तुंग षटकार मारला. हा चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने मारला. चेंडू थेट स्टेडियमच्या सर्वात वरील स्टॅण्डवर गेला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com