
जिथे विषय गंभीर असतो तिथे विराट खंबीर असतो. जेव्हा जेव्हा भारतीय संघाला विराटच्या खेळीची गरज असते तेव्हा तेव्हा तो मोठी खेळी करून संघाला विजय मिळवून देतो. सामना पाकिस्तानविरुद्ध असेल, तर आऊट ऑफ फॉर्म विराट फॉर्ममध्ये परततो आणि शानदार शतकी खेळी करतो.
अशीच काहीशी खेळी भारत – पाकिस्तान सामन्यात पहायला मिळाली आहे. या सामन्यात विराटने शतक झळकावलं आणि भारताला सामना जिंकून दिला. यादरम्यान त्याने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगचा. रेकॉर्ड मोडून काढला आहे.
पाकिस्तानविरुद्ध झळकावलेलं हे शतक विराट कोहलीच्या वनडे कारकिर्दीतील ५१ वे शतक ठरले आहे. यासह त्याने आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण ८२ शतकं पूर्ण केली आहेत. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात विराटने १११ चेंडूंचा सामना करत ७ चौकारांच्या साहाय्याने नाबाद १०० धावांची खेळी केली.
या खेळीच्या बळावर त्याची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली. पाकिस्तानने भारतीय संघासमोर जिंकण्यासाठी २४२ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाने ४२.३ षटकात दिलेलं आव्हान पूर्ण केलं.
विराट कोहली मॉडर्न डे क्रिकेटमधील सर्वात यशस्वी फलंदाज आहे. दरम्यान या सामन्यात फलंदाजी करताना त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या रेकॉर्डमध्ये रिकी पाँटिंगला मागे सोडलं आहे. पाँटिंगला मागे सोडत,विराट सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तिसऱ्या स्थानी जाऊन पोहोचला आहे.
गेल्या काही महिन्यांपासून विराट कोहलीची बॅट शांतच होती. मात्र आता चॅम्पियन्स ट्रॉफीत तो फॉर्ममध्ये परतला आहे. विराटने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २७५०३ धावा केल्या आहेत. तर रिकी पाँटिंगच्या नावे २७४०३ धावा करण्याची नोंद आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड हा भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. त्याने ३४३५७ धावा केल्या आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.