India vs England: विराट कोहलीच्या जागेवर कोण? हे ३ फलंदाज शर्यतीत, एकानं तर शतकही ठोकलंय

विराट कोहली पहिल्या वनडेत खेळू शकला नाही तर त्याच्या जागी रोहित शर्माला या तिघांपैकी एकाला निवडावे लागणार आहे.
India vs England T20 Highlights, Virat Kohli T20 Runs, Rohit Sharma News
India vs England T20 Highlights, Virat Kohli T20 Runs, Rohit Sharma News SAAM TV
Published On

मुंबई: इंग्लंडविरुद्धच्या तीन वनडे सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. मालिकेला सुरुवात होण्याआधीच कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या अडचणीत भर पडली आहे. केनिंगटन ओव्हलवर खेळवण्यात येणाऱ्या पहिल्या वनडे सामन्यात विराट कोहली खेळणार का, याबाबत साशंकता आहे. अशा वेळी पहिल्या वनडे सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये विराट कोहलीला पर्यायी खेळाडू निवडण्याचे रोहित शर्मासमोर मोठे आव्हान आहे. (India vs England T20 Highlights)

India vs England T20 Highlights, Virat Kohli T20 Runs, Rohit Sharma News
India Vs England 1st ODI | भारत-इंग्लंड वनडेत आमनेसामने; कुठे आणि कधी पाहाल मॅच?

विराट कोहली (Virat Kohli) हा इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात जखमी झाला होता. त्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यासाठी विराट अद्याप फिट नाही. तो प्लेइंग इलेव्हनमध्ये नसेल, अशी शक्यता आहे. अशा वेळी तिसऱ्या क्रमांकावर विराटच्या जागी पर्यायी खेळाडू निवडावा लागणार आहे.

आघाडीचे फलंदाज बाद झाल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर येऊन विराटसारखा डाव सावरू शकतो, अशा खेळाडूची कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) निवड करावी लागणार आहे. तिसऱ्या क्रमांकासाठी आता रोहित शर्मासमोर कोणकोणते पर्यायी खेळाडू आहेत, ज्यांची निवड केली जाऊ शकते, अशा खेळाडूंबाबत जाणून घेऊयात.

भारतासाठी आतापर्यंत ७ वनडे मॅच खेळणारा सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) हा टीम इंडियामध्ये विराट कोहलीची जागा घेण्यासाठी सर्वात चांगला पर्याय आहे. सूर्यकुमार हा गेल्या काही काळापासून चांगल्या फॉर्मात आहे. त्याने इंग्लंडच्या विरुद्ध तिसऱ्या टी-२० मॅचमध्ये ११७ धावांची तुफानी खेळी केली होती. मात्र, त्याआधीच्या आयर्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत त्याने खास अशी कामगिरी केली नव्हती. (Suryakumar Yadav News)

India vs England T20 Highlights, Virat Kohli T20 Runs, Rohit Sharma News
....तेव्हाही दिग्गज खेळाडूंना ड्रॉप केलं जायचं, भारताच्या माजी क्रिकेटपटूचं कोहलीबाबत मोठं विधान

मात्र, तरीही रोहित शर्मा हा तिसऱ्या क्रमांकावर सूर्यकुमारला फलंदाजीसाठी पाठवण्याचा निर्णय घेऊ शकतो. सूर्यकुमार यादव हा आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून रोहित शर्मासोबत खेळला आहे. तिसऱ्या क्रमांकावर येऊन त्याने संघाला विजय मिळवून दिला आहे. अशात सूर्यकुमार यादव हा विराट कोहलीच्या स्थानावर चांगला पर्याय असू शकतो.

सूर्यकुमार यादवनंतर कर्णधार रोहित शर्मासमोर दुसरा पर्याय हा श्रेयस अय्यर असू शकतो. अय्यर भारतासाठी आतापर्यंत २६ सामने खेळला आहे. त्याने ९४७ धावा केल्या आहेत. श्रेयसला जेव्हा जेव्हा टीम इंडियात खेळण्याची संधी मिळाली आहे, त्यावेळी त्याने चांगल्या कामगिरीने सर्वांनाच प्रभावित केले आहे. अय्यरने आयपीएलमध्येही तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी केली आहे. त्याने चांगली कामगिरीही केली आहे. टीम इंडियात तिसऱ्या क्रमांकावर खेळण्यासाठी अय्यर हा सक्षम पर्याय असू शकतो.

दुसरीकडे, रिषभ पंत हा देखील या शर्यतीत आहे. टीम इंडियात तो चौथ्या किंवा पाचव्या स्थानी फलंदाजीसाठी येतो. पंत हा स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो. तो तिसऱ्या क्रमांकावर येऊन तुफानी खेळी करू शकतो. कोणत्याही क्रमांकावर फलंदाजीसाठी येऊन चांगला खेळ दाखवू शकतो. त्याचमुळे पंतला इंग्लंडविरुद्ध टी-२० मालिकेत कर्णधार रोहित शर्माने सलामीला पाठवले होते. (Ind vs Eng T20 News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com