IND vs CAN, Weather Update: भारत- कॅनडा सामना रद्द होणार? समोर आलं चिंता वाढवणारं कारण

ICC World Cup 2024 India vs Canada Weather Update: भारत आणि कॅनडा या दोन्ही संघांमध्ये होणारा सामना रद्द होऊ शकतो. काय आहे कारण? जाणून घ्या.
IND vs CAN, Weather Update: भारत- कॅनडा सामना रद्द होणार? समोर आलं चिंता वाढवणारं कारण
IND vs CANGoogle

भारतीय संघाने आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेत आतापर्यंत ३ सामने खेळले आहेत. हे तिन्ही सामने जिंकून भारतीय संघाने सुपर ८ मध्ये प्रवेश केला आहे. तर साखळी फेरीतील शेवटचा सामना कॅनडाविरुद्ध होणार आहे. हा सामना फ्लोरिडामध्ये रंगणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघ फ्लोरिडात दाखल झाला आहे. मात्र जोरदार पाऊस असल्याने भारतीय संघाला सराव सत्र रद्द करावं लागलं आहे.

भारतीय संघाचं सराव सत्र रद्द

भारत आणि कॅनडा या दोन्ही संघांमध्ये होणारा सामना १५ जून रोजी होणार आहे. या सामन्याच्या १ दिवसापूर्वी भारतीय संघाचं सराव सत्र होणार होतं. मात्र पावसामुळे हे सराव सत्र रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून फ्लोरिडामध्ये वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे अमेरिका आणि आयर्लंडसह भारत आणि कॅनडा यांच्यात होणारा सामना देखील रद्द केला जाऊ शकतो.

IND vs CAN, Weather Update: भारत- कॅनडा सामना रद्द होणार? समोर आलं चिंता वाढवणारं कारण
Team India News: सुपर ८ आधीच टीम इंडियाचे २ स्टार खेळाडू मायदेशी परतणार! मोठं कारण आलं समोर

भारतीय संघाने टी-२० वर्ल्डकप स्पर्धेतील सुपर ८ मध्ये प्रवेश केला आहे. साखळी फेरीतील सामने झाल्यानंतर सुपर ८ च्या सामन्यांसाठी भारतीय संघ वेस्टइंडिजला रवाना होणार आहे. सुपर ८ मध्ये भारतीय संघाचे सामने २०, २२ आणि २४ जून रोजी होणार आहेत.

IND vs CAN, Weather Update: भारत- कॅनडा सामना रद्द होणार? समोर आलं चिंता वाढवणारं कारण
IND vs USA: टीम इंडियाला एक्स्ट्रा ५ धावा का मिळाल्या? अमेरिकेला ही एक चूक महागात पडली

भारत- कॅनडा सामना रद्द होणार?

श्रीलंका आणि नेपाळ यांच्यात होणारा सामना एकही चेंडू न टाकता रद्द केला गेला होता. सोशल मीडियावर लॉडरहीलमध्ये होत असलेल्या पावसाचे अनेक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहेत. ज्यात वाहणं वाहून जात असल्याचं दिसून येत आहे. पावसामुळे हा सामना रद्द झाला, तर भारतीय संघाला फार फरक पडणार नाही. मात्र अमेरिका आणि आयर्लंड यांच्यातील सामना रद्द झाला, तर पाकिस्तानचा संघ शेवटचा सामना जिंकूनही सुपर ८ मध्ये प्रवेश करु शकणार नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com