Ind vs Ban: 12 वर्षांनी टीम इंडियात संधी, शमीची जागा घेणार; बांगलादेशच्या नाकीनऊ आणणार

India vs Bangladesh: बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत टीम इंडियात संधी मिळाली तर, त्याचा हा १२ वर्षांतील दुसरा कसोटी सामना ठरणार आहे.
India vs bangladesh
India vs bangladeshSAAM TV

Ind vs Ban : भारत आणि बांगलादेश यांच्यातील वनडे मालिकेनंतर कसोटी मालिकाही खेळवली जाणार आहे. दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी टीम इंडियाची निवड करण्यात आली आहे. मात्र, संघ निवडीनंतर सर्वात अनुभवी गोलंदाज मोहम्मद शमी दुखापतीमुळं या मालिकेत खेळणार नाही. अशात शमीच्या जागी कुणाला खेळवायचं? असा प्रश्न टीम इंडिया व्यवस्थापनाला पडला होता. पण आता त्याचं उत्तर मिळालं आहे. जयदेव उनाडकटला संधी मिळाली आहे. टीम इंडियाकडून तो चार वर्षांपूर्वी खेळला होता. त्यात एक कसोटी सामनाही खेळला होता.

India vs bangladesh
IND vs BAN : टीम इंडियाची प्रतिष्ठा पणाला, बांग्लादेशविरुद्ध आज तिसरा एकदिवसीय सामना; कशी असेल Playing XI?

टीम इंडियात अनुभवी गोलंदाजाची जागा दुसऱ्या अनुभवी गोलंदाजालाच घेता येईल, असं मानलं जात होतं. त्यामुळंच ३१ वर्षीय जयदेव उनाडकटला टीम इंडियाच्या कसोटी संघात स्थान देण्यात आलं आहे. त्यानं केवळ एकच कसोटी सामना भारतासाठी खेळलेला आहे. मात्र, देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याला या फॉरमॅटमध्ये खेळण्याचा दीर्घ अनुभव आहे. याशिवाय बांगलादेशमधील परिस्थिती भारतापेक्षा वेगळी आहे. त्यामुळं शमीऐवजी उनाडकटची दावेदारी भक्कम असल्याचं मानलं जातंय. (Cricket News)

India vs bangladesh
IND Vs BAN, 3rd ODI : भारत-बांगलादेश तिसरी वनडे कधी-कुठे बघाल? जाणून घ्या एका क्लिकवर

जयदेव कसोटी संघात

मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुकेश कुमार किंवा उमरान मलिक यांच्यापैकी एकाला कसोटी संघात स्थान मिळेल, अशी चर्चा होती. मात्र,या दोघांनाही टीम इंडियाच्या कसोटी संघात स्थान देण्यात येणार नाही. मोहम्मद शमीची जागा जयदेव उनाडकट घेणार आहे. (Team India)

१२ वर्षांनी कसोटी संघात स्थान

जयदेव उनाडकट यानं १२ वर्षांपूर्वी टीम इंडियाच्या कसोटी संघात पदार्पण केलं होतं. २०१० मध्ये तो दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळला होता. तेथून त्याची आंतरराष्ट्रीय कारकीर्द सुरू झाली होती. मात्र, त्या कसोटी सामन्यानंतर तो कधीच कसोटी संघातून खेळला नाही. आता १२ वर्षांनंतर त्याला दुसरा कसोटी सामना खेळण्याची संधी मिळणार आहे. या संधीचं तो सोनं नक्की करेल, अशी अपेक्षा आहे.

पहिल्या कसोटीत एकही विकेट घेतली नाही

सौराष्ट्रचा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकट यानं भारताकडून खेळलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात एकही विकेट घेतली नव्हती. आता १२ वर्षांचा काळ लोटला आहे. आता त्याच्याकडे मोठा अनुभव आहे. त्याचा हा अनुभव देशांतर्गत क्रिकेटचा असला तरी, बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत तो कामी येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. जयदेवनं फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये ९६ सामन्यांत ३५३ विकेट घेतल्या आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com