
India vs Bangladesh 3rd ODI : भारत आणि बांगलादेश यांच्यात सुरू असलेल्या एकदिवसीय सामन्याच्या मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना आज खेळवणार जाणार आहे. पहिल्या दोन सामन्यांत दारूण पराभव झाल्यानंतर भारताने एकदिवसीय मालिका गमावली आहे. आता किमान तिसऱ्या सामन्यांत विजय मिळवून व्हाईट वॉश टाळण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल. (Latest Marathi News)
दुसरीकडे बांगलादेशनं जर हा सामनाही जिंकला तर, तो क्रिकेट इतिहासातील सुवर्ण क्षण त्यांच्यासाठी असणार आहे. आधीच मालिका गमावणारा भारतीय संघ (Team India) सध्या दुखापतग्रस्त खेळाडू आणि फिटनेसच्या समस्यांमुळं त्रस्त आहे. मालिकेआधीच टीम इंडियाकडे २० खेळाडू होते. मात्र, दोन सामन्यांनंतर टीम इंडियाकडे पर्याय म्हणून केवळ १४ खेळाडू उरले आहेत.
आतापर्यंत झालेल्या दोन एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाचे सहा खेळाडू दुखापतग्रस्त झाले आहेत. त्यातील रोहित शर्मा हा महत्वाचा खेळाडू मुंबईला परतला आहे. त्याची जागा केएल राहुल घेणार आहे. केएल राहुल ओपनिंगला आला, तर मिडल ऑर्डरमध्ये रजत पाटीदार किंवा राहुल त्रिपाठी यापैकी एका खेळाडूला संधी मिळू शकते. ते टीमसोबत आहेत. पण त्यांना अजून संधी मिळालेली नाही.
भारतीय गोलंदाजांची खरी परीक्षा
तिसऱ्या एकदिवसीय सामन्यांत भारतीय संघाच्या गोलंदाजीवर नजरा (Cricket News) असतील, कारण पहिल्या दोन सामन्यांत भारतीय गोलंदाजांनी सुरूवातीच्या ओव्हरमध्ये विकेट्स घेतल्यानंतरही अखेरच्या काही षटकांत त्यांना बांग्लादेशच्या तळातील फलंदाजांनी अक्षरश: घाम फोडला आहे. तिसऱ्या सामन्यांत मोहम्मद सिराज आणि उमरान मलिक या पेस बॉलर्सच खेळणं निश्चित आहे. याशिवाय शार्दुल ठाकूरच्या रुपात तिसरा गोलंदाज असेल.
भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
केएल राहुल (कॅप्टन), शिखर धवन, इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, वॉशिंगटन सुंदर, अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज आणि उमरान मलिक
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.