Ishan Kishan : 'ईशान' वादळ बांगलादेशात धडकलं, वर्ल्ड रेकॉर्ड मोडला; सर्वात वेगवान द्विशतक

Ishan Kishan Double Hundred :बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात ईशान किशननं विस्फोटक फलंदाजी केली. द्विशतक ठोकून त्यानं वर्ल्ड रेकॉर्ड केला.
Ishan Kishan Double Hundred/BCCI Twitter
Ishan Kishan Double Hundred/BCCI TwitterSAAM TV
Published On

Ishan Kishan Double Hundred : भारतात मंदोस वादळानं धडक दिली असली तरी, भारताच्या 'ईशान' वादळानं बांगलादेशला मोठा तडाखा दिलाय. बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात ईशान किशननं विस्फोटक फलंदाजी केली. त्यानं बांगलादेशच्या गोलंदाजांच्या अक्षरशः चिंधड्या उडवल्या. त्यानं द्विशतक ठोकलं. ईशाननं फक्त ८५ चेंडूंत आपलं पहिलं शतक ठोकलं. त्यानंतर स्फोटक फलंदाजी करून वेगवान द्विशतक झळकावलं. त्याचे लाजवाब फटके डोळ्यांत साठवून ठेवण्यासारखे होते.

भारतानं बांगलादेशविरुद्धची वनडे मालिका गमावली आहे. २-० ने बांगलादेश आघाडीवर आहे. तिसऱ्या सामन्यात क्लीन स्वीप वाचवण्यासाठी उतरलेल्या टीम इंडियाच्या सलामीवीर ईशान किशननं कमाल केली. बांगलादेशी गोलंदाजांवर तो तुटून पडला. चौकार-षटकारांचा पाऊस पाडला. (Ishan Kishan)

Ishan Kishan Double Hundred/BCCI Twitter
Ind vs Ban: 12 वर्षांनी टीम इंडियात संधी, शमीची जागा घेणार; बांगलादेशच्या नाकीनऊ आणणार

मागील दोन वनडे सामन्यांत भारताच्या फलंदाजीला मेटाकुटीला आणणाऱ्या मेहदी हसन मिराज आणि इबादत होसैन या दोघांची धुलाई केली. दुखापतीमुळं संघाबाहेर झालेल्या रोहित शर्माच्या जागी शिखर धवनसोबत ईशान किशन मैदानावर आला. धवन ४ धावा करून बाद झाल्यानंतर ईशाननं डावाला आकार दिला. (Cricket News)

Ishan Kishan Double Hundred/BCCI Twitter
Team India : टीम इंडियात मोठी उलथापालथ, हेड कोचला हटवलं; 39 शतके ठोकणाऱ्या खेळाडूची एन्ट्री

१०० धावांनंतर गिअर बदलला

अनुभवी सलामी फलंदाज शिखर धवन बाद झाल्यानंतर ईशान दुसऱ्या बाजूने किल्ला लढवत होता. त्याला विराट कोहलीनं जबरदस्त साथ दिली. कोहली मैदानावर असल्यानं ईशाननं गिअर बदलला. त्यानं १०० धावा अवघ्या ८५ चेंडूंत केल्या. त्यानंतरच्या १०० धावा मात्र वेगानं तडकावल्या. १०३ चेंडूंत त्यानं १५० धावा केल्या. वनडेमध्ये सर्वात वेगवान १५० धावा करण्याचा विक्रमही त्यानं आपल्या नावावर केला.

ईशानची वादळासारखी एन्ट्री

ईशान किशन यानं जवळपास दोन महिन्यांनी वनडे संघात पुनरागमन केलं. तो टीम इंडियासाठी अखेरचा सामना ११ ऑक्टोबरला खेळला होता. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तो खेळला होता. मात्र, त्यावेळी त्याच्या बॅटमधून धावा निघाल्या नाहीत. खराब फॉर्ममुळं तो संघाबाहेर झाला. आता त्यानं वापसी करून धावांची बरसात केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com