World Cup Final 2023: टीम इंडियाचे 'हे' ४ धुरंदर ऑस्ट्रेलियावर पडणार भारी; अहमदाबादच्या खेळपट्टीशी आहे खास कनेक्शन!

ODI World Cup Final 2023: अटीतटीच्या लढतीत ऑस्ट्रेलियाला पराभवाची धुळ चारण्यासाठी रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ सज्ज झाला आहे.
ODI World Cup Final 2023:
ODI World Cup Final 2023: BCCI Twitter
Published On

Ind Vs Australia World Cup Final 2023:

गेल्या एक महिना सुरू असलेल्या विश्वचषकाच्या थराराची या सामन्याने सांगता होईल. भारत आणि ऑस्ट्रेलिया (Ind Vs Aus) हे बलाढ्य संघ विश्वचषकावर नाव कोरण्यासाठी समोरा- समोर येतील. या अटीतटीच्या लढतीत ऑस्ट्रेलियाला पराभवाची धुळ चारण्यासाठी रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ सज्ज झाला आहे. या सामन्यात संपूर्ण विश्वचषकात हिरो ठरलेले आणि अहमदाबादच्या खेळपट्टीशी खास नाते असलेले ४ खेळाडूच ऑस्ट्रेलियाला भारी पडणार आहेत.

विकेटची हमी मोहम्मद शमी...

अर्थातच.. या संपूर्ण विश्वचषकात मोहम्मद शमीने (Mohammed Shami) अशी काही जबरदस्त कामगिरी केलीय ज्याला तोड नाही. विश्वचषकाच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलिया संघाचा सामना मोहम्मद शमीशी होणार आहे. शमी बंगालकडून देशांतर्गत क्रिकेट खेळत असला तरी आयपीएलमध्ये तो गुजरातचा स्टार आहे. अशा परिस्थितीत शमी स्थानिक खेळाडू म्हणून अंतिम फेरीत मैदानात उतरेल. शमी या स्पर्धेत आतापर्यंत सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे.

जड्डूच्या फिरकीची जादू...

रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) हा टीम इंडियाचा सध्याचा स्टार अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखला जातो. जडेजा बॉलिंग, बॅटिंग आणि क्षेत्ररक्षण अशा सर्वच आघाड्यांवर यशस्वी ठरताना दिसतोय. तसेच रवींद्र जडेजा हा गुजरातचा रहिवासी आहे. जडेजालाही अहमदाबादमध्ये खेळण्याचा भरपूर अनुभव आहे. त्यामुळे टीम इंडियासाठी हा आणखी एक प्लस पॉईंट असेल.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)


ODI World Cup Final 2023:
World Cup 2023: वर्ल्डकप विजेत्या टीमवर पैशांचा पाऊस! पराभूत संघही मालामाल होणार; किती असेल बक्षिसांची रक्कम?

बुम बुम बुमराह....

यॉर्कर्सचा बादशाह म्हणून प्रसिद्ध असलेला जसप्रीत बुमराहही (Jasprit Bumrah) अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध मोठे आव्हान उभे करेल. बुमराह हा देखील येथील स्थानिक मुलगा आहे. तो गुजरातचा रहिवासी असून त्याला अहमदाबादची खेळपट्टी खेळण्याचाही भरपूर अनुभव आहे. त्यामुळे बुमराहच्या गोलंदाजीपुढे टिकाव धरताना ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांची दमछाक होणार आहे.

शुभमन गिल...

या विश्वचषकात मुर्ती लहान किर्ती महान म्हणत शुभमनने (Shuhman Gill) फलंदाजीची चुणूक दाखवून दिली आहे. संघाला गरज असताना शुभमनने स्फोटक फलंदाजी करत आपली योग्यता सिद्ध केलीय. सर्वात जमेची बाजू म्हणजे शुभमन गिल हा देखील अहमदाबादचा स्थानिक खेळाडू आहे. पंजाबचा हा खेळाडू आयपीएलमधील गुजरात टायटन्सकडून खेळतो. त्याला नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळण्याचाही मोठा अनुभव आहे. (Latest Marathi News)

ODI World Cup Final 2023:
IND vs AUS, World Cup Final: ना धोनी,ना विराट..जे कोणालाच नाही जमलं ते हिटमॅन करुन दाखवणार! WC फायनलमध्ये रचणार इतिहास

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com