Ind Vs Aus Test Series: दुसऱ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाचा मास्टर प्लॅन; 2022 गाजवलेल्या खेळाडूला मिळणार संधी?

अरुण जेटली स्टेडियम येथे होणाऱ्या या सामन्यातून मालिकेत पुनरागमन करण्याचा ऑस्ट्रेलिया संघाचा प्रयत्न असेल.
Ind Vs Aus Test Series
Ind Vs Aus Test SeriesSaamtv
Published On

Ind Vs Aus 2nd Test: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरा कसोटी सामना उद्या, शुक्रवारी (१७ फेब्रुवारी) होणार आहे. दिल्ली येथील अरूण जेटली स्टेडिअममध्ये हा सामना खेळवला जाईल. भारतानं नागपूर कसोटीत पाहुण्या ऑस्ट्रेलिया संघाला एक डाव आणि १३२ धावांनी पराभूत केलं होते.

अरुण जेटली स्टेडियम येथे होणाऱ्या या सामन्यातून मालिकेत पुनरागमन करण्याचा ऑस्ट्रेलिया संघाचा प्रयत्न असेल. नागपूर येथील पहिल्या कसोटीत पराभूत व्हावे लागल्यानंतर, ऑस्ट्रेलिया संघ या कसोटीसाठी आपल्या संघात बदल करताना दिसणार आहे. ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्स याने याबाबतचे सूचक वक्तव्य केले आहे. (Cricket News)

Ind Vs Aus Test Series
Ind Vs Aus Test Series: दुसऱ्या कसोटीत आर अश्विन करणार मोठा विक्रम? कपिलदेव, अनिल कुंबळेलाही पछाडण्याची संधी

नागपुर कसोटीत ऑस्ट्रेलियाला एक डाव आणि 132 धावांनी जिंकला. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी भारतीय फिरकीपटूं पुढे नांग्या टाकल्याने त्यांना हा पराभव पत्करावा लागला. दिल्ली कसोटीआधी बोलताना ऑस्ट्रेलियन कर्णधार कमिन्सने संघात बदल होण्याची हिंट दिली.

मधल्या फळीतील फलंदाज ट्रेविस हेडबद्दल बोलताना, हेड सध्या शानदार फॉर्ममध्ये आहे. त्याची मागील वर्षातील कामगिरी उत्कृष्ट होती. त्याचा संघात समावेश करण्याबाबत आमची चर्चा सुरू आहे ‌” अशी प्रतिक्रिया कमिन्सने दिली आहे..

Ind Vs Aus Test Series
Ind Vs Aus 2nd Test : सूर्यकुमार की अय्यर, रोहित शर्मा कुणाला संधी देणार? टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग ११

दिल्ली कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाचा संभाव्य संघ-

डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅब्युशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रेविस हेड, ऍलेक्स केरी‌ (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, टॉड मर्फी, नॅथन लायन व जोस हेजलवूड.

टीम इंडियाची (Team India) संभाव्य प्लेइंग इलेव्हन...

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत, रविंद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com