Ind Vs Aus 2nd Test: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरा कसोटी सामना उद्या, शुक्रवारी (१७ फेब्रुवारी) होणार आहे. दिल्ली येथील अरूण जेटली स्टेडिअममध्ये हा सामना खेळवला जाईल. भारतानं नागपूर कसोटीत पाहुण्या ऑस्ट्रेलिया संघाला एक डाव आणि १३२ धावांनी पराभूत केलं होते.
दुसऱ्या कसोटी सामन्यात आर अश्विनला (Ravichandran Ashwin) मोठा विक्रम करण्याची संधी निर्माण झाली आहे. रविचंद्रन अश्विनने नागपूर कसोटी सामन्यात कसोटी फॉर्मेटमध्ये 450 विकेट्स पूर्ण केले असून आता त्याला दिल्ली कसोटी सामन्यादरम्यान आणखी काही महत्त्वाचे विक्रम मोडण्याची संधी आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध नेहमीच रविचंद्रन अश्विनच्या गोलंदाजीची धार पाहायला मिळते. नागपूर कसोटी सामन्यात अश्विनने दमदार कामगिरी करत संघाच्या विजयात मोलाची कामगिरी पार पाडली होती. त्यामुळेच कसोटी मालिकेत खेळण्याआधी कांगारू संघही त्यांच्याविरुद्ध जोरदार तयारी करताना दिसत होता. मात्र आता दिल्ली कसोटी सामन्यातही त्याच्याकडून अशाच कामगिरीची सर्वांना अपेक्षा असेल.
दिल्ली कसोटी सामन्याबद्दल बोलायचं झालं तर रविचंद्रन अश्विन दोन मोठे विक्रम आपल्या नावावर करू शकतो. यामध्ये त्याने या कसोटी सामन्यात आणखी 3 विकेट्स घेतल्यास अनिल कुंबळेनंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये 100 बळी घेणारा तो दुसरा भारतीय गोलंदाज ठरेल.
त्याचबरोबर अश्विनने दिल्ली कसोटी सामन्यात आणखी 6 विकेट्स घेतल्यास कपिल देवला (Kapil Dev) मागे टाकून दिल्लीत सर्वाधिक कसोटी बळी घेणारा तो दुसरा गोलंदाज ठरेल.
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत, रविंद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.