Prithvi Shaw: सेल्फीसाठी वाद मोबाईलही हिसकावला! भररस्त्यात पृथ्वी शॉची तरुणीसोबत बाचाबाची; व्हिडिओ व्हायरल

या प्रकरणात आणखी एक ट्विस्ट आला असून एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये शॉ तरूणीसोबत वाद करत असल्याचं दिसत आहे
Prithvi Shaw Viral Video
Prithvi Shaw Viral VideoSaamtv
Published On

Prithvi Shaw Viral Video: भारतीय क्रिकेटर पृथ्वी शाॅ सोबत सेल्फी घेण्यावरून झालेल्या वादातून बुधवारी पहाटे पृथ्वी शाॅच्या मित्राच्या गाडीवर हल्ला झाला आहे. या प्रकरणी ओशिवरा पोलीस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आता या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. ज्यामध्ये पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) आणि तरुणीमध्ये बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळत आहे.

Prithvi Shaw Viral Video
Prithvi Shaw : पृथ्वी शाॅच्या मित्राच्या गाडीवर हल्ला; दोन जणांवर गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?

काय आहे प्रकरण..

पृथ्वी शॉ त्याचे मित्र आशिष आणि ब्रिजेशसोबत एका हॉटेलमध्ये डिनरसाठी गेला होता. जिथे सेल्फीवरून काही मुला-मुलींसोबत त्याचं भांडण झालं. शॉने आधी सेल्फी दिला मात्र परत सेल्फी घ्यायला आल्यावर त्याने आपण जेवण करत असल्याचं सांगत सेल्फी दिला नाही. शॉने नकार दिल्यामुळे तिथं भांडण झालं.

Prithvi Shaw Viral Video
Kasba Byelection: आजारी गिरीश बापट व्हीलचेअरवर प्रचारात, लाडक्या नेत्याची अवस्था पाहून कार्यकर्त्यांना अश्रू अनावर, पाहा VIDEO

हॉटेलमधील मॅनेजरने सेल्फी घेण्यासाठी आलेल्यांना बाहेर जाण्यास सांगितलं. जेवण झाल्यानंतर शॉ आणि त्याचे मित्र बाहेर गेले तेव्हा काही लोक आधीच बेसबॉलची बॅट घेऊन उभे होते. त्यानंतर त्यांनी आमचा पाठलाग केला आणि गाडीची काच फोडली. पेट्रोल पंपाजवळ त्यांची गाडी थांबवली. हल्ला करणाऱ्यांनी अशी धमकी दिली की जर 50 हजार दिले नाहीतर खोटा गुन्हा दाखल करू, याबाबतची माहिती आशिषने पोलिसांना दिली.

या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. ज्यामध्ये सपना आणि तिच्यासोबत उपस्थित असलेले लोक पृथ्वी आणि त्याच्या मित्रांवर मारहाणीचा आरोप करत आहेत. यासोबतच पृथ्वीसोबत बाचाबाची करताना देखील व्हिडिओमध्ये दिसत असल्याचे तो सांगत आहे.

या भांडणाच्या व्हिडिओमध्ये पृथ्वी महिला चाहत्याचा सामना करत असून दोघांनी बेसबॉलची बॅट धरल्याचेही दिसून येते. वकिलाचे म्हणणे आहे की, “त्यांची आरोपी सपना हिला ओशिवरा पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले आहे. तिला मेडिकल तपासणीला देखील जाऊ दिले जात नाही.” (Viral Video)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com