भारताच्या क्रिकेट संघासाठी २ एप्रिलची तारीख भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी खास आहे. आजच्या दिवशी भारतीय क्रिकेट संघाचा २८ वर्षांचा दुष्काळ संपला. २०११ साली भारताच्या क्रिकेट इतिहासात दुसऱ्यांदा वनडे विश्वचषक जिंकला. भारताने १९८३ साली पहिला विश्वचषक हा कपिल देवच्या नेतृत्वात जिंकला. तर दुसरा विश्वचषक हा धोनीच्या नेतृत्वात २ एप्रिल २०११ रोजी जिंकला. आज हा विश्वचषक जिंकून १३ वर्षे झाली आहेत. या विश्वचषकाच्या आठवणी अजूनही ताज्या आहेत.
२ एप्रिल २०११ रोजी भारतीय क्रिकेट आणि श्रीलंकेदरम्यान विश्वचषकाचा अंतिम सामना हा वानखेडे स्टेडियमवर झाला. या अंतिम सामन्यात टीम इंडियाने श्रीलंकेचा ६ गडी राखून धुव्वा उडवला. महेंद्र सिंह यांच्या नेतृत्वात टीम इंडियाने विश्वचषक जिंकून इतिहास रचला. टीम इंडियाने घरच्या मैदानावर क्रिकेट इतिहासात पहिल्यांदा विश्वचषक जिंकला होता.
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर श्रीलंकेच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात श्रीलंकेच्या महेला जयवर्धने याने शतकी खेळी खेळली. श्रीलंकेच्या संघाने ५० षटकात २७४ धावा कुटल्या. श्रीलंकेने दिलेल्या धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियाची सुरुवात खराब झाली.
धावांचा पाठलाग करताना सचिन तेंडुलकर आणि विरेंद्र सहवाग लवकर बाद झाले. त्यानंतर गौतम गंभीर आणि विराट कोहलीने डाव सावरला. विराट कोहलीने ३५ धावा कुटल्या. तर गंभीरने ९७ धावा कुटल्या होत्या. दुसरीकडे भारताचा कर्णधार महेंद्र सिंह धोनीने ७९ चेंडूत ९१ धावा केल्या.
धोनीने अंतिम सामन्यात ४९ व्या षटकात नुवान कुलशेखराच्या चेंडूवर षटकार लगावत टीम इंडियाला विजय मिळवून दिला. धोनीच्या षटाकारामुळे २८ वर्षांचा दुष्काळ संपला. विश्वचषक जिंकल्याचा ऐतिहासिक दिवस भारतीय क्रिकेट चाहते कधीही विसरू शकत नाही. विश्वचषक जिंकल्यामुळे टीम इंडियाला तिन्ही फॉरमॅटमध्ये नंबर - एकचा संघ मानला जातो.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.