सध्या ऑस्ट्रेलियाचा महिला संघ भारत दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका सुरू आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाची कर्णधार एलिसा हेलीने नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान गोलंदाजी करताना भारताची स्टार गोलंदाज पूजा वस्त्राकरने असा काही चेंडू टाकला एलिसा हेलीला कळालाच नाही. काही कळायच्या आत ती क्लीन बोल्ड होऊन माघारी परतली.
तर झाले असे की, भारतीय संघाची गोलंदाजी सुरू असताना कर्णधार हरमनप्रीत कौरने चेंडू पूजा वस्त्राकरकडे सोपवला. तिने दहाव्या षटकातील पहिल्याच चेंडूवर ऑस्ट्रेलियन कर्णधाराची दांडी गुल केली. पूजाने टाकलेल्या चेंडूवर एलिसा हेलीने स्टेप आऊट होऊन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र तिचा हा प्रयत्न फसला. बॅट आणि चेंडूचा कुठलाही संपर्क झाला नाही. चेंडू थेट यष्टी उडवत निघून गेला. यासह कर्णधार एलिसा हेली १३ धावांवर माघारी परतली. तर भारतीय संघाला पहिली विकेट मिळाली. (Latest sports updates)
भारताचा सलग दुसरा पराभव
या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाकडून प्रथम फलंदाजी करताना लिचफिल्डने सर्वाधिक ६३ धावांची खेळी केली. तर एलसा पेरीने ५० आणि अलाना किंगने सर्वाधिक २८ धावांची खेळ केली.
ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना २५८ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाला २५५ धावा करता आल्या. भारतीय संघाला हा सामना केवळ ३ धावांनी गमवावा लागला आहे. दरम्यान या पराभवासह भारतीय संघ या मालिकेत २-० ने पिछाडीवर आहे.