IND vs UAE: क्रिकेटमधील सर्वात मोठा उलटफेर! UAE कडून भारताचा पराभव

Hong Kong Super Sixes: क्रिकेटमध्ये सर्वात मोठा उलटफेर पाहायला मिळाला आहे. UAE ने भारतीय संघाचा पराभव केला आहे.
IND vs UAE: क्रिकेटमधील सर्वात मोठा उलटफेर! UAE कडून भारताचा पराभव
IND VS UAETwitter
Published On

Hong Kong Super Sixes, IND vs UAE: हाँगकाँगमध्ये सुपर सिक्सेस स्पर्धेचा थरार सुरु आहे. या स्पर्धेत भारतीयसंघाचा फ्लॉप शो सुरुच आहे. पाकिस्ताननतंर यूएईकडूनही भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. स्पर्धेतील सलग २ सामने गमावल्यानंतर भारतीय संघ या स्पर्धेतूनही बाहेर पडला आहे.

या सामन्यात यूएईचा संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरला होता. प्रथम फलंदाजी करताना यूएईच्या फलंदाजांनी तुफान फटकेबाजी केली. या फलंदाजीच्या बळावर यूएईने १३० धावांपर्यंत मजल मारली. भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी १३१ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना, भारतीय संघाने दजदार सुरुवात केली.

IND vs UAE: क्रिकेटमधील सर्वात मोठा उलटफेर! UAE कडून भारताचा पराभव
IND vs NZ: 150 वर्षांत जे कोणालाच जमलं नव्हतं, ते गिल करु शकला असता; महारेकॉर्ड अवघ्या 10 धावांनी हुकला

भारतीय संघाकडून फलंदाजी करताना, रॉबिन उथप्पा आणि स्टूअर्ट बिन्नी सलामीला आले होते. दोघांनी मिळून संघाला दमदार सुरुवात करुन दिली. सलामीला फलंदाजी करताना, स्टूअर्ट बिन्नीने ११ चेंडूंचा सामना करत ४४ धावांची खेळी केली. तर रॉबिन उथप्पाने १० चेंडूंचा सामना करत ४३ धावा केल्या.

भारतीय संघाला या सामन्यात चांगली सुरुवात मिळाली होती. पण हवा तसा शेवट करता आला नाही. भारतीय संघाला या सामन्यात १२९ धावांपर्यंत मजल मारता आली. त्यामुळे हा सामना १ धावेने गमवावा लागला आहे. मालिकेतील सुरुवातीचे दोन्ही सामने गमावल्यामुळे भारतीय संघ या स्पर्धेतून बाहेर पडला आहे.

IND vs UAE: क्रिकेटमधील सर्वात मोठा उलटफेर! UAE कडून भारताचा पराभव
IND vs NZ 3rd Test: आकाश दीपच्या रॉकेट बॉलवर टॉम लेथमची बत्ती गुल; स्टम्प उडून पडले लांब- VIDEO

पाकिस्ताननेही केलं होतं पराभूत

या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात भारतीय संघाला ६ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला होता. या सामन्यातील विजयासह पाकिस्तानने क्वार्टरफायनलमध्ये प्रवेश केला होता. या सामन्यात फलंदाजी करताना भारतीय संघाने पहिल्या डावात ११९ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानने शानदार विजयाची नोंद केली.

या सामन्यात भारतीय संघाकडून फलंदाजी करताना, उथप्पाने ८ चेंडूत ३१ धावांची खेळी केली. तर भरत ने १६ चेंडूंचा सामना करत ५३ धावांची खेळी केली. पाकिस्तानला हा सामना जिंकण्यासाठी १२० धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना, पाकिस्तानने या धावांचा पाठलाग करताना तुफान सुरुवात केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com