IND vs SL: टीम इंडियाने उभारला 357 धावांचा डोंगर! पाहा पहिल्या इनिंगचे Top 4 Key Moments

India vs Srilanka Highlights: या सामन्यात भारतीय संघाने ३५७ धावांचा डोंगर उभारला आहे.
team india
team indiatwitter
Published On

India vs Srilanka Highlights:

वानखेडेच्या मैदानावर भारतीय फलंजादाजांची बॅट चांगलीच तळपली आहे. या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक गमावली. तर नाणेफेक जिंकून श्रीलंकेचा कर्णधार कुसल मेंडिसने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं.

या आमंत्रणाचा स्विकार करत भारतीय संघाने ५० षटकअखेर ३५७ केल्या आहेत. तर श्रीलंकेला हा सामना जिंकण्यासाठी ३५८ धावांची गरज आहे. दरम्यान पाहा भारतीय संघाच्या पहिल्या डावातील हायलाईट्स.

रोहित शर्मा स्वस्तात माघारी..

या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. कारण तो आपल्या होम ग्राऊंडवर खेळण्यासाठी उतरला होता.मात्र त्याला या सामन्यात मोठी खेळी करता आलेली नाही. पहिल्या चेंडूवर चौकार मारल्यानंतर दुसऱ्याच चेंडूवर तो त्रिफळाचित होऊन माघारी परतला आहे.

विराटचं शतक हुकलं पण केला मोठा रेकॉर्ड

या सामन्यातही विराटला शतकी खेळी करण्याची संधी होती. मात्र तो सामन्यात ८८ धावा करत माघारी परतला. त्याला या सामन्यात सचिनच्या शतकांच्या विक्रमाची बरोबरी करता आली नाही. मात्र २०२३ मध्ये वनडे क्रिकेटमध्ये १ हजार धावा पूर्ण केल्या आहेत. यासह तो सर्वाधिक वेळेस एकाच वर्षात १ हजार धावा पूर्ण करणारा फलंदाज ठरला आहे. (Latest sports updates)

team india
IND vs SL: ....तर माझ्यावर वाईट कर्णधार असल्याचा ठपका बसेल; श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यापूर्वी रोहित असं का म्हणाला?

गिलचं शतक हुकलं..

विराटसह शुभमन गिलला देखील या सामन्यात शतक पूर्ण करण्याची संधी होती. मात्र तो ९२ चेंडूंचा सामना करत ९२ धावा करत माघारी परतला.

लोकल बॉय सूर्या फ्लॉप तर श्रेयस अय्यर चमकला..

हा सामना मुंबईच्या वानखेडे मैदानावर सुरु आहे. त्यामुळे श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव आणि रोहित शर्मा लोकल बॉय आहेत. रोहित शर्मा आणि सू्र्यकुमार यादव या सामन्यात फ्लॉप ठरले आहेत. रोहित शर्मा ४ तर सूर्यकुमार यादव १२ धावा करत माघारी परतला. श्रेयस अय्यर या सामन्यात चमकला. त्याने या सामन्यात ८२ धावांची तुफानी खेळी केली.

team india
Shreyas Iyer Longest Six: एकच मारला कडक मारला! लोकल बॉय श्रेयस अय्यरने मारला WC 2023 स्पर्धेतील सर्वात लांब षटकार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com