IND vs SA W World Cup 2025 : नवी मुंबईत ऊन अन् पावसाचा 'खेळ'; विश्वचषकाचा अंतिम सामना रद्द झाल्यास कोण चॅम्पियन होणार?

IND vs SA W World Cup 2025 : मुंबईत ऊन अन् पावसाचा 'खेळ' सुरुये. विश्वचषकाचा अंतिम सामना रद्द झाल्यास दोन्ही संघ संयुक्त विजेते घोषित केले जातील.
IND vs SA Women
IND vs SA W World Cup 2025 : Saam tv
Published On
Summary

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका महिला विश्वचषकाच्या फायनलला पावसाचा अडथळा

सामन्याचा टॉससुद्धा पावसामुळे होऊ शकला नाही

अंतिम सामना न झाल्यास दोन्ही संघांना संयुक्त विजेता घोषित केले जाईल

भारत तिसऱ्यांदा आणि दक्षिण आफ्रिका पहिल्यांदाच फायनलमध्ये

IND vs SA Women World Cup 2025 :भारत आणि दक्षिण आफ्रिकेमधील आयसीसी महिला विश्वचषक सामन्यावर पावसाचं विघ्न आहे. पावसामुळे अंतिम सामन्याचा टॉस देखील झाला नाही. टॉस होण्याआधीच मुंबई, नवी मुंबईत जोरदार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे भारतीय चाहत्यांचं टेन्शन वाढलं आहे.

पावसाच्या शक्यतेमुळे भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या अंतिम सामन्यासाठी एक राखीव दिवस देखील ठेवण्यात आला आहे. आजच्या सामन्यासाठी दोन तासांचा वाढीव वेळ देण्यात आला आहे. त्यानंतर ओव्हरमध्ये कपात करण्यात येईल. राखीव दिवशी देखील पावसामुळे सामना रद्द झाल्यास दोन्ही संघाना संयुक्त विजेता म्हणून घोषित करण्यात येईल .

IND vs SA Women
रोमहर्षक अंतिम सामना! वर्षानुवर्षांच्या संघर्षानंतर दिल्लीचा ‘दबंग’ विजय; पुणेरी पलटनच्या संस्मरणीय हंगामाचा भावनिक शेवट

सामना सुरु होण्याच्या काही तासांआधी नवी मुंबईमध्ये जोरदार पाऊस सुरु होता. या पावसामुळे मैदानातील काही भागात पाणी साचलं आहे. भारताचा संघ तिसऱ्यांदा विश्वचषकाच्या फायनलमध्ये पोहोचला आहे. तर दक्षिण आफ्रिकेचा संघ हा पहिल्यांदा फायनलमध्ये पोहोचला आहे.

दोन्ही संघाने विश्वचषकाचा अंतिम सामना जिंकण्याचे वेध लागले आहेत. भारताने सेमीफायनल सामन्यात ऑस्ट्रेलियाचा धूळ चारली, त्यामुळे भारतीय चाहत्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. हरमनप्रीत कौर आणि टीमला कोट्यवधी चाहत्यांचं मन जिंकण्याची संधी आहे. दुसरीकडे सामन्यावर पावसाचं सावट पाहायला मिळत आहे.

IND vs SA Women
Kalyan : 28 वर्षीय तरुणीने बिल्डिंगच्या टेरेसवरून उडी मारून आयुष्य संपवलं, १५ दिवसांपूर्वी आली होती बहिणीकडे
IND vs SA Women
Sports legend Death : भारताच्या स्टार खेळाडूचं निधन, क्रीडा विश्वावर शोककळा

पाऊस थांबल्यास सामना सुरु करण्याची शक्यता आहे. आजच्या सामन्यात भारतीय फलंदाजांसमोर तगडी धावसंख्या उभारण्याचं आव्हान असणार आहे. भारताच्या महिला क्रिकेट संघाला इतिहास रचण्याची मोठी संधी चालून आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com