Ind vs SA : सूर्याचं वादळ; राहुलचा झंझावात; भारतानं दक्षिण आफ्रिकेला लोळवलं

दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या पहिल्या टी २० सामन्यात भारतानं आठ विकेट राखून दणदणीत विजय मिळवला.
Ind vs SA 1st T 20/ BCCI/Twitter
Ind vs SA 1st T 20/ BCCI/TwitterSAAM TV
Published On

Ind vs SA 1st T 20 | टी-२० वर्ल्डकपआधीच्या टेस्टमध्ये टीम इंडियाचा संघ उत्तीर्ण झाला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्याच टी-२० सामन्यात भारतानं दणदणीत विजय मिळवला. गोलंदाजांचा खोचक मारा आणि त्यानंतर फलंदाजांनी केलेली कमाल या जोरावर रोहितच्या नेतृत्वाखालील टीम इंडियानं आठ गडी राखून दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवला. तीन विकेट बाद करणारा अर्शदीप सिंग हा प्लेअर ऑफ द मॅच ठरला.

ऑस्ट्रेलियात पुढच्या महिन्यात टी-२० वर्ल्डकप (T20 World Cup) स्पर्धा होणार आहे. त्याआधी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 'टेस्ट' होत आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धची पहिली परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात भारतानं (Team India) दणदणीत विजय मिळवून मिशन मेलबर्नच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले आहे.

Ind vs SA 1st T 20/ BCCI/Twitter
ICC T-20 Ranking : सूर्यकुमार यादव नंबर-१ च्या जवळ, टॉप-१० मध्ये भारताचा एकटा टायगर

नाणेफेक जिंकून भारतानं गोलंदाजीचा निर्णय घेतला. रोहित शर्माचा हा निर्णय गोलंदाजांनी सार्थ ठरवला. दीपक चाहरनं पहिलं यश मिळवून दिलं. तर स्पेलच्या पहिल्याच षटकामध्ये अर्शदीप सिंह यानं तीन विकेट घेऊन दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजीचा कणा मोडला.

दक्षिण आफ्रिकेचा अर्धा संघ एकेरी धावसंख्येवरच गारद झाला. त्यानंतर मार्क्रमनं एका बाजूने डाव सावरला. त्याला पार्नेल आणि केशव महाराज यांनी चांगली साथ दिली. मार्क्रमच्या २५ धावा, पार्नेलच्या २४ धावा आणि केशव महाराजच्या ४१ धावांच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेनं भारतासमोर आव्हानात्मक लक्ष्य ठेवलं.

Ind vs SA 1st T 20/ BCCI/Twitter
Team India Jersey : टीम इंडिया टी20 विश्वचषकात दिसणार नव्या अवतारात; जर्सीचा लूक आला समोर

दक्षिण आफ्रिकेनं ठेवलेलं माफक आव्हान घेऊन मैदानात उतरलेला सलामीवीर आणि कर्णधार रोहित शर्मा शून्यावरच बाद झाला. त्यानंतर विराट कोहलीही बाद झाला. त्यामुळे भारताचा डाव कोलमडेल असं वाटत होतं. पण एका बाजूने अडखळणाऱ्या केएल राहुलनं डाव सावरला. त्याला सूर्यकुमार यादवने जबरदस्त साथ दिली.

सूर्यकुमारनं आक्रमक फलंदाजी करून अर्धशतकी खेळी केली. केएल राहुलनेही अर्धशतकी खेळी केली. या दोघांनी भारताला विजय मिळवून दिला. या विजयासह भारतानं मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com