Ind vs Nep 2023: रोहित शर्मा आणि शुभमनची दमदार खेळी; टीम इंडियाचा नेपाळवर दणदणीत विजय

आशिया कप स्पर्धेत भारत विरुद्ध नेपाळचा सामना झाला. या सामन्यात भारताने नेपाळवर मोठा विजय मिळवला.
Ind vs Nep 2023:
Ind vs Nep 2023:twitter
Published On

India vs Nepal 2023

आशिया कप स्पर्धेत भारत विरुद्ध नेपाळचा सामना झाला. या सामन्यात भारताने नेपाळवर मोठा विजय मिळवला. टीम इंडियाने नेपाळवर १० गडी राखून विजय मिळवला. कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमनच्या दमदार खेळीमुळे टीम इंडियाने सहज सामना जिंकला. (Latest Marathi News)

टीम इंडियाने नेपाळवर मोठा विजय मिळवला आहे. नेपाळने भारताला २३१ धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र, सामन्यादरम्यान पाऊस पडला. यामुळे डकवर्थ लुईस नियमानुसार सामन्याचे षटक कमी केरण्यात आले. त्यामुळे भारताला २३ षटकात १४५ धावा करण्याचं आव्हान होतं.

१४५ धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या टीम इंडियाच्या रोहित शर्मा आणि शुभमनने दमदार खेळ दाखवला. टीम इंडियाने २१.१ षटकातच १४७ धावा कुटल्या. टीम इंडियाने सहज सामना जिंकला. रोहितने ५९ चेंडूत ६ चौकार आणि ५ षटकार लगावत ७५ धावा कुटल्या. तर शुभमन गिलने ६२ चेंडूत ६७ धावा कुटल्या. त्याने ८ चौकार आणि १ षटकार लगावला. भारत विरुद्ध नेपाळ असा पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना होता.

Ind vs Nep 2023:
Cricket Rules: क्रिकेटमध्ये १,२ नव्हे तर इतक्या पद्धतीने फलंदाज होऊ शकतात बाद

भारताची सुपर-४ मध्ये एन्ट्री

टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या टीम नेपाळने ४८.२ षटकात २३० धावा कुटल्या. त्यानंतर या धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या टीम इंडियाने २.१ षटक खेळल्यानंतर मैदानात पावसाचं आगमन झालं. त्यामुळे दोन तास सामना रखडला. यानंतर डकवर्थ लुईस नियमानुसार मिळालेलं आव्हान टीम इंडियाने सहज केलं.

भारत विरुद्ध पाकिस्तान सामना पुन्हा होणार

टीम इंडियाच्या विजयामुळे सुपर-४ मध्ये एन्ट्री झाली आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान सामना पाहायला मिळणार आहे. १० सप्टेंबर रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान असा सामना क्रिकेट चाहत्यांना पाहायला मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com