ENGvsIND: भारतीय संघासमोर इंग्लंडचे आव्हान; संघ निवडीसाठी करावा लागणार संघर्ष

इंग्लंडविरुद्धच्या (ENGvsIND) पाच कसोटी सामन्यांतील पहिल्या कसोटीसाठी परिपूर्ण भारतीय संघ निवडण्याची त्याची रणनीती कसोटीला लागणार आहे.
ENGvsIND
ENGvsINDTwitter/ @BCCI
Published On

विराट कोहलीच्या (Virat Kohli) कर्णधारपदाच्या कारकिर्दीतील सर्वात कठीण चार महिन्यांची सुरुवात बुधवारी नॉटिंगहॅममध्ये होणार आहे. इंग्लंडविरुद्धच्या (ENGvsIND) पाच कसोटी सामन्यांतील पहिल्या कसोटीसाठी परिपूर्ण भारतीय संघ निवडण्याची त्याची रणनीती कसोटीला लागणार आहे. कोहलीच्या संघाने काही दिवस आधी न्यूझीलंडविरुद्ध विश्व कसोटी (WTC 2021) अजिंक्यपद अंतिम फेरीसाठी प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली होती आणि अटींचा आदर न केल्यामुळे त्याला टीकेला सामोरे जावे लागले होते.

कोहलीला बुधवारी संघाला मजबूत परिस्थीतीमध्ये आणण्यासाठी खूप विचार करुण निर्णय घ्यावा लागणार आहे. भारताची खालची फळी विषेश काही करु शकलेली नाही. ते धावा काढण्यात अपयशी ठरले आहेत. भारतीय संघाकडे फक्त दोन सलामीवीर आहेत त्यापैकी रोहित शर्मा खूप सक्षम आहे परंतु त्याने इंग्लंडच्या परिस्थितीमध्ये कसोटी क्रिक्रेटमध्ये विषेश काही कामगिरी केलेली नाही. दुसरा सलामीवीर, लोकेश राहुल आहे राहूलचे कसोटी मधले आकडे पाहिले तर त्याला सुरुवातीला सेट व्हायला थोडा संघर्ष करावा लागतो.

ENGvsIND
स्वातंत्र्य दिनी भारतीय ऑलिम्पिक खेळाडूंना पंतप्रधान मोदींचे आमंत्रण

राहुलने कसोटीत 2000 पेक्षा जास्त धावा केल्या आणि मयंक अग्रवालच्या डोक्याला दुखापत झाल्यानंतर रोहितसोबत सलामविर म्हणून राहूल येणार आहे. भारताला हार्दीक पांड्या सारख्या अष्टपैलू खेळाडूची कमी नक्कीच जाणवणार आहे. त्याचबरोबर संघात फिरकीपटूंची देखील कमी जाणवणार आहे. बंगालचा अभिमन्यू ईश्वरन याच्या निवडीकडे भारताचे लक्ष असेल. अशा परिस्थीतीमध्ये हनुमा विहारीवरतीही विराटचे लक्ष असणार आहे. कारण नव्या चेंडूवर विहारी विशेष खेळ करताना आपल्याला दिसला आहे.

विहारीची ऑफ स्पिन गोलंदाजी आणि रविचंद्रन अश्विनच्या उपस्थितीमुळे शार्दुल ठाकूरला संघात खेळण्याची संधी मिळू शकते आणि गोलंदाजी अष्टपैलू म्हणून त्याला अनुभवी रवींद्र जडेजापेक्षा प्राधान्य दिले जाऊ शकते. जसप्रीत बुमराहला 2019 मध्ये कसोटी गोलंदाजासारखे यश मिळाले नसले तरी अलीकडे त्याचा फॅार्म परत येत असल्याचे दिसत आहे. त्याचबरोबर भारताचा सध्याचा वेगवान गोलंदाज महमंद सिराजकडेही दुर्लक्ष करुण चालणाल नाही. कारण सिराज बाऊंसर हे घातक असतात त्याची प्रचिती मयंक अग्रवालला झालेली दुखापत आहे.

ENGvsIND
ऊसतोड कामगाराचा आंतरराष्ट्रीय क्रिक्रेटर पर्यंतचा प्रवास; पाहा Video

गेल्या इंग्लंड दौऱ्यात कोहलीच्या कर्णधारपदावर प्रश्न उपस्थित झाले होते. जेव्हा त्याने लॉर्ड्सच्या गवताने भरलेल्या खेळपट्टीवर कुलदीप यादवला संघात घेतले होते. त्याचप्रमाणे, ढगाळ आकाश असूनही, त्याने फलंदाजी मजबूत करण्यासाठी जडेजाला निवडले होते आणि नंतर त्याच्याकडून पुरेशी गोलंदाजी करुन घेतली नाही. शेवटच्या प्रथम श्रेणी सामन्यात शतक झळकावल्यामुळे राहूलच्या आत्मविश्वासात वाढ झाली आहे. पण जर आपण इंग्लंडमधील टीम इंडियाच्या कामगिरीबद्दल बोललो तर संघाने गेल्या तीन दौऱ्यांमध्ये 14 पैकी 11 कसोटी गमावल्या आहेत आणि या दरम्यान महेंद्रसिंग धोनी दोन मालिकांमध्ये कर्णधार होता.

2014 च्या मालिकेत कोहली संघाचा भाग होता जेव्हा भारत 1-3 ने हरला होता आणि संघाचा उपकर्णधार फलंदाजीत सपशेल अपयशी ठरला होता. कोहलीने 2018 मध्ये पुनरागमन केले आणि भरपूर धावा केल्या पण लॉर्ड्समध्ये खराब संघ निवड आणि साऊथॅम्प्टन येथे एका हंगामात खराब फलंदाजीमुळे भारताला 1-4 अशी हार स्वीकारावी लागली होती.

भारतीय संघ पुन्हा एकदा जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉडला ड्यूक चेंडूंना सामोरे जाण्याचे आव्हान पेलेल का याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. अँडरसन आणि ब्रॉडच्या अनुभवी जोडीला जगातील सर्वात वेगवान गोलंदाज मार्क वुड आणि तरुण ऑली रॉबिन्सन यांची साथ मिळेल. रोरी बर्न्स, डॉम सिबली, डेन लॉरेन्स, जॅक क्रॉली आणि ऑली पोप सारखे खेळाडू कधीकधी आत्मविश्वासात दिसत नाहीत आणि ते अश्विन आणि शमीला कसे सामोरे जातात हे पाहणे मनोरंजक असणार आहे.

भारत संभाव्या संघ

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, ऋषभ पंत, आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, लोकेश राहुल, रिद्धिमान साहा, अभिमन्यू ईश्वरन, पृथ्वी शॅा आणि सूर्यकुमार यादव.

इंग्लंड संभाव्य संघ

जो रूट (कर्णधार), जेम्स अँडरसन, जॉनी बेअरस्टो, डोम बेस, स्टुअर्ट ब्रॉड, रोरी बर्न्स, जोस बटलर, जॅक क्रोली, सॅम करन, हसीब हमीद, डेन लॉरेन्स, जॅक लीच, ऑली पोप, ऑली रॉबिन्सन, डोम सिबली, मार्क वुड.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com