IND vs ENG 4th T20I: पुण्यात पंड्या पॉवर! मुंबईकर दुबेचीही मिळाली साथ; भारताने इंग्लंडसमोर ठेवलं मोठं आव्हान

India vs England 4th T20I Highlights: भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या टी-२० सामन्यात भारतीय संघाने पहिल्या डावात फलंदाजी करताना मोठी धावसंख्या उभारली आहे.
IND vs ENG 4th T20I: पुण्यात पंड्या पॉवर! मुंबईकर दुबेचीही मिळाली साथ; भारताने इंग्लंडसमोर ठेवलं मोठं आव्हान
arshdeep singhtwitter
Published On

पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेटच्या असोसिएशनच्या मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांच्या मालिकेतील चौथा टी-२० सामना सुरु आहे. या निर्णायक सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाला २० षटकअखेर ९ गडी बाद १८१ धावा करता आल्या आहेत. हार्दिक पंड्या आणि शिवम दुबेच्या शानदार भागीदारीच्या बळावर भारतीय संघाने मोठी धावसंख्या उभारली आहे.

IND vs ENG 4th T20I: पुण्यात पंड्या पॉवर! मुंबईकर दुबेचीही मिळाली साथ; भारताने इंग्लंडसमोर ठेवलं मोठं आव्हान
IND vs ENG: निर्णायक सामन्यात भारताची प्लेइंग ११ बदलणार? अर्शदीपचं कमबॅक, या गोलंदाजाची होणार सुट्टी

भारतीय संघाची सुपरफ्लॉप सुरुवात

भारतीय संघाला या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्याची संधी मिळाली. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाला हवी तशी सुरुवात मिळाली नव्हती. डावातीत दुसऱ्याच षटकात भारतीय संघाला एका पाठोपाठ सलग ३ मोठे धक्के बसले.

महमूदच्या पहिल्याच चेंडूवर संजू सॅमसन बाद होऊन माघारी परतला. त्यानंतर तिलक वर्मा देखील गोल्डन डकवर तंबूत परतला. पुढील ३ चेंडू निर्धाव राहिल्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव शेवटच्या चेंडूवर बाद होऊन माघारी परतला. या षटकात भारतीय संघाने ३ विकेट्स गमावल्या, पण एकही धाव जमा करता आली नाही.

हार्दिक - दुबेची महत्वपूर्ण भागीदारी

भारतीय संघाला सुरुवातीला मोठे धक्के बसल्यानंतर संपूर्ण जबाबदारी अनुभवी खेळाडू हार्दिक पंड्यावर होती. ही जबाबदारी त्याने योग्यरित्या पार पाडली. सुरुवातीचे काही चेंडू त्याने निर्धाव खेळून काढले. मात्र त्यानंतर त्याला जेव्हा चेंडू त्याच्या बॅटवर यायला लागला तेव्हा त्याने चेंडू स्टँड्समध्ये पाठवायला सुरुवात केली. भारतीय संघाच्या १५० धावाही होणार नव्हत्या. मात्र शेवटच्या काही षटकांमध्ये हार्दिक आणि शिवमने इंग्लंडच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. दोघांनी मिळून ४८ चेंडूंचा सामना करत ८७ धावांची भागीदारी केली. या भागीदारीच्या जोरावर भारतीय संघाने मोठी धावसंख्या उभारली. हार्दिक पंड्या ५३ धावा करत माघारी परतला. तर शिवम दुबेने देखील शानदार अर्धशतकी खेळी केली.

IND vs ENG 4th T20I: पुण्यात पंड्या पॉवर! मुंबईकर दुबेचीही मिळाली साथ; भारताने इंग्लंडसमोर ठेवलं मोठं आव्हान
IND vs ENG: इंग्लंडचा गोलंदाजीचा निर्णय! शमीला डच्चू, या 3 खेळाडूंचं संघात कमबॅक; पाहा प्लेइंग ११

या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:

भारत (Playing XI): संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, रिंकू सिंग, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती.

इंग्लंड (Playing XI): फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), बेन डकेट, जोस बटलर (कर्णधार), हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बॅथेल, जेमी ओव्हर्टन, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, साकिब महमूद.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com