Shubman Gill Century: दोनदा हुकलं, पण तिसऱ्यांदा शंभरी गाठली! शतक पूर्ण करताच गिलच्या पाडला रेकॉर्ड्सचा पाऊस

India vs England 3rd ODI, Shubman Gill Century: भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या वनडे सामन्यात गिलने शानदार शतकी खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने मोठे रेकॉर्ड मोडून काढले आहेत.
Shubman Gill Century: दोनदा हुकलं, पण तिसऱ्यांदा शंभरी गाठली! शतक पूर्ण करताच गिलच्या पाडला रेकॉर्ड्सचा पाऊस
shubman gilltwitter
Published On

शुभमन गिलने भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात शानदार शतकी खेळी केली आहे. मालिकेतील सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये त्याने अर्धशतकी खेळी केली होती. त्याच्याकडे शतक झळकावण्याची संधी होती.

मात्र तिसऱ्या सामन्यात त्याने अखेर आपलं शतक पूर्ण केलं. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडलेल्या सामन्यात त्याने ९५ चेंडूंचा सामना करत आपल्या क्रिकेट कारकिर्दीतील ७ वे शतक पूर्ण केले. यासह त्याने ५०७ दिवसांनंतर शतक पूर्ण केलं आहे.

Shubman Gill Century: दोनदा हुकलं, पण तिसऱ्यांदा शंभरी गाठली! शतक पूर्ण करताच गिलच्या पाडला रेकॉर्ड्सचा पाऊस
IND vs ENG: तिसऱ्या वनडेसाठी टीममध्ये मोठ्या बदलांची शक्यता; रोहित घेणार कठीण निर्णय? पाहा संभाव्य प्लेईंग ११

शुभमन गिलचं रेकॉर्डब्रेकिंग शतक

अहमदाबादच्या मैदानावर शतक पूर्ण करताच गिलने इतिहास रचला आहे. गिल अहमदाबादच्या मैदानावर खेळताना वनडे, कसोटी आणि टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतकी खेळी करणारा पहिलाच फलंदाज ठरला आहे. यापूर्वी कुठल्याही फलंदाजाला असा कारनामा करता आलेला नाही.

यासह तो वनडे क्रिकेटच्या इतिहासात सर्वात जलद ७ शतकं झळकावणारा फलंदाज ठरला आहे. गिलने हा कारनामा ५० व्या डावात करुन दाखवला आहे. इतकेच नव्हे, तर ५० व्या डावात शतकी खेळी करणारा तो पहिलाच भारतीय फलंदाज ठरला आहे.

Shubman Gill Century: दोनदा हुकलं, पण तिसऱ्यांदा शंभरी गाठली! शतक पूर्ण करताच गिलच्या पाडला रेकॉर्ड्सचा पाऊस
Ind vs Eng: चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळे वरूण चक्रवर्ती टीममधून बाहेर!

वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जलद २५०० धावा

गिलने या डावाच्या सुरुवातीलाच मोठा रेकॉर्ड मोडून काढला. तो वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जलद २५०० धावा करणारा फलंदाज ठरला आहे. गिलने हा मोठा कारनामा ५० व्या डावात करुन दाखवला आहे. या रेकॉर्डमध्ये त्याला हाशिम आम्लाला मागे सोडलं आहे. आम्लाने हा कारनामा ५१ व्या डावात करुन दाखवला होता.

गिलचं शानदार शतक

इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना रोहित शर्मा आणि शुभमन गिलची जोडी डावाची सुरुवात करण्यासाठी मैदानात आली. मात्र रोहित अवघी १ धाव करत तंबूत परतला. त्यानंतर गिलने विराटसोबत मिळून भागीदारी केली. विराटला ५२ धावा करता आल्या. त्यानंतर गिलने अय्यरसोबत मिळून भागीदारी करत आपलं शतक पूर्ण केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com