परफेक्ट टायमिंग अन् चेंडू किपरच्या डोक्यावरुन बाऊंड्रीपार; Suryakumar Yadav चा सुपला शॉट पाहून प्रेमातच पडाल -VIDEO

Suryakumar Yadav Supla Shot: भारत आणि बांगलादेश यांच्यात झालेल्या तिसऱ्या टी-२० सामन्यात सूर्यकुमार यादवने शानदार शॉट मारला आहे.
परफेक्ट टायमिंग अन् चेंडू किपरच्या डोक्यावरुन बाऊंड्रीपार; Suryakumar Yadav चा सुपला शॉट पाहून प्रेमातच पडाल -VIDEO
suryakumar yadavtwitter
Published On

IND vs BAN, Suryakumar Yadav Supla Shot: भारतीय टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव आपल्या विस्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो. मिस्टर ३६० म्हणून ओळखला जाणाऱ्या सूर्याने बांगलादेशविरुद्ध झालेल्या तिसऱ्या टी-२० सामन्यात धावांचा पाऊस पाडला.

संजू सॅमसन आणि सूर्याने चौफेर फटकेबाजी करत बांगलादेशच्या गोलंदाजांना सळो की पळो करुन सोडलं. यादरम्यान त्याने एक शॉट मारला, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

सूर्यकुमार यादवचा सुपला शॉट

सूर्यकुमार यादव सुपला शॉट मारण्यासाठी प्रसिद्ध आहे. बांगलादेशविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. आधी संजू सॅमसनने चौकार- षटकारांचा पाऊस पाडत ४० चेंडूत आपलं शतक पूर्ण केलं. संजू सॅमसन १११ धावांवर माघारी परतल्यानंतर उरलेलं काम सूर्याने पूर्ण केलं. त्याने ७५ धावांची शानदार खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने सुपला शॉट मारला.

परफेक्ट टायमिंग अन् चेंडू किपरच्या डोक्यावरुन बाऊंड्रीपार; Suryakumar Yadav चा सुपला शॉट पाहून प्रेमातच पडाल -VIDEO
IND vs BAN: दसऱ्याला टीम इंडियानं लुटलं धावांचं सोनं; बांगलादेशच्या गोलंदाजांना धुतलं, षटकार-चौकारांचा पाऊस

तर झाले असे की, बांगलादेशकडून गोलंदाजी करण्यासाठी तस्कीन अहमद गोलंदाजीला आला होता. या षटकात तस्कीनने बाऊन्सर चेंडू टाकला. दुसरा कुठला फलंदाज असता, तर हा चेंडू सोडून दिला असता. मात्र माघार घेईल, तो सूर्या कसला. सूर्या चेंडूच्या लाईनमध्ये आला, थोडा खाली वाकला आणि चेंडूला दिशा दाखवत किपरच्या वरुन शानदार षटकार खेचला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

परफेक्ट टायमिंग अन् चेंडू किपरच्या डोक्यावरुन बाऊंड्रीपार; Suryakumar Yadav चा सुपला शॉट पाहून प्रेमातच पडाल -VIDEO
IND vs BAN Records: रेकॉर्ड ब्रेकिंग सामना! टीम इंडियाने एकाच सामन्यात मोडून काढले हे मोठे रेकॉर्ड्स

या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकला आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघाकडून फलंदाजी करताना, संजू सॅमसनने सर्वाधिक १११ धावांची खेळी केली. तर सूर्याने ७५ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर भारतीय संघाने २९७ धावांपर्यंत मजल मारली. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या बांगलादेशला १६४ धावा करता आल्या. यासह भारतीय संघाने हा सामना १३३ धावांनी आपल्या नावावर केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com