Sanju Samson Record News: हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर पार पडलेल्या तिसऱ्या टी-२० सामन्यात संजू सॅमसन नावाचं वादळ घोंगावलं. सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये सुपरफ्लॉप ठरलेला संजू सॅमसन तिसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय संघासाठी सुपरस्टार ठरला आहे. बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडत आपल्या टी-२० कारकिर्दीतील पहिलं शतक झळकावलं.
यशस्वी जयस्वालच्या अनुपस्थितीत संजू सॅमसनला बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत डावाची सुरुवात करण्याची संधी देण्यात आली होती. सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये त्याला मोठी खेळी करता आली नव्हती. मात्र मालिकेतील तिसऱ्या सामन्यात त्याने रेकॉर्डब्रेकिंग खेळी करत स्वत:ला सिद्ध केलं आहे.
संजूने पहिल्या चेंडूपासून बांगलादेशच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला. आधी २२ चेंडूत त्याने आपलं अर्धशतक पूर्ण केलं. त्यानंतर ४० चेंडूंचा सामना करत आपल्या टी-२० कारकिर्दीतील पहिलं शतक झळकावलं आहे. तो ४७ चेंडूत १११ धावांची खेळी करत माघारी परतला. या खेळीदरम्यान त्याने ११ चौकार आणि ८ षटकार खेचले. हे टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारत संघाकडून झळकावलेलं दुसरं सर्वात वेगवान शतक ठरलं आहे.
सलामीला आलेला अभिषेक शर्मा स्वस्तात माघारी परतल्यानंतर सूर्यकुमार आणि संजू सॅमसनची जोडी जमली. या दोघांनी केलेली फटकेबाजी बांगलादेशचे गोलंदाज कधीच विसरणार नाही. दोघांनी तुफान फटकेबाजी केली आणि पावरप्लेच्या षटकांमध्येच ८२ धावांचा पल्ला गाठला.
टी-२० क्रिकेटमध्ये हार्दिक पंड्याचा रेकॉर्ड दमदार राहिला आहे. त्याच्या टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील रेकॉर्डबद्दल बोलायचं झालं, तर त्याने ३० सामन्यांमध्ये ४४४ धावा केल्या आहेत. यापूर्वी त्याने २ अर्धशतकं झळकावली होती. तर त्याचा आयपीएल स्पर्धेतील रेकॉर्ड पाहिला, तर त्याने १६८ सामन्यांमध्ये त्याने ३०.७ च्या सरासरीने ४४१९ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या नावे २५ अर्धशतकं आणि ३ शतक झळकावण्याची नोंद आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.